शिरूर प्रतिनिधी
मांडवगण फराटा ता. शिरूर मांडवगण फराटा ते वडगाव रासाई जाणारे रस्त्यावर शिरूर रोहीदास थोरात यांचे घराचेजवळ भरधाव वेगात आलेल्या डंपरने पिकपला धडक देऊ झालेल्या अपघातात दोघांचा मृत्यू तर एक जखमी झाले आहे. मयता मध्ये बारा वर्षीय शाळकरी मुलाचा सामावेश आहे.
या अपघातात सागर संभाजी कोळपे (वय 28 वर्षे रा. मांडवगण फराटा ता. शिरूर ),यश सुधाकर भिसे (वय 12 वर्षे सध्या रा. मांडवगण फराटा, कोळपेवरती ता. शिरूर,मुळ रा. खेडवाडी ता. गेवराई जि. बीड) हे दोघे मरण पावले आहेत तर अनिल बीरा कोळपे (रा. मांडवगण फराटा, कोळपेवरती ता. शिरूर) हे जखमी झाले आहे.
याबाबत दादा बाळासो कोळपे (वय 38 वर्षे, रा. मांडवगण फराटा, कोळपेवस्ती ता. शिरूर) यांनी फिर्याद दिली आहे.
याबाबत डंपर चालक याच्या विरोधात शिरूर पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत शिरूर पोलिसांनी दिलेली माहिती पुढीलप्रमाणे दिनांक १७ मे रात्री आठ वाजण्याचा सुमारास मांडवगण फराटा येथील वडगाव रासाई रस्त्यावर रोहीदास थोरात यांचे घराचेजवळ मांडवगण फराटा बाजुकडुन वडगाव रासाई बाजुकडे जाणारा डंपर वाहन नंबर एम एच 42 से क्यु 7696 यावरील चालक नाव पत्ता माहीत नाही याने त्याचे ताब्यात डंपर हा हयगईने, अविचाराने भरधाव वेगात चालवुन विरुद्ध बाजूला जावुन समोरून येणारे पीकअप वाहन नंबर एम एच 03 ओ एवं 0638 हीला समोरून जोरात धडक दिली या अपघातात सागर कोळपे व यश भिसे हे दोघे ठार झाले तर अनिल कोळपे जखमी झाले असून, अपघाता नंतर डंपर चालक फरार झाला आहे.
ही धडक एवढी जोरात होती की दोन्ही वाहने रस्त्यावर पलटी झाली होती.
याबाबत शिरूर पोलीस स्टेशन येथे डंपर चालकावर गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास शिरूर पोलिस स्टेशन पोलिस निरीक्षक संदेश केंजळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक हणमंत नकाते करीत आहे.