बुक ऑफ एक्सलन्स, इंग्लंडतर्फे नाथाभाऊ शेवाळे यांचा सर्वोच्च सन्मान!*
शिरूर प्रतिनिधी
जनता दल सेक्युलर पक्षाचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष नाथाभाऊ शेवाळे यांच्या महाराष्ट्रातील आजवरच्या सामाजिक व राजकीय कार्याची दखल घेऊन ग्लोबल बुक ऑफ एक्सलन्स, इंग्लंड यांच्यातर्फे त्यांना 'सर्टिफिकेट ऑफ एक्सलन्स' देऊन सन्मानित करण्यात आले आहे.
भारताचे माजी पंतप्रधान व जनता दल सेक्युलर पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष एच. डी. देवेगौडा जी यांच्या प्रमुख उपस्थितीत व KAMKUS, London चे संस्थापक प्रोफेसर डॉ. दिवाकर सुकुल यांच्या हस्ते दिल्ली येथे त्यांना सर्टिफिकेट ऑफ एक्सलन्स देऊन गौरविण्यात आले.
त्यांचे नेतृत्वगुण तसेच महाराष्ट्रातील लोकांसाठी समर्पित वृत्तीने, तत्वनिष्ठ राहून त्यांनी आजवर केलेलं काम अनेकांसाठी प्रेरणादायी आहे. या शब्दात ग्लोबल बुक ऑफ एक्सलन्स, इंग्लंड या आंतरराष्ट्रीय संस्थेने त्यांचा गौरव केला आहे.
(ग्लोबल बुक ऑफ एक्सलन्स, इंग्लंड या आंतरराष्ट्रीय संस्थेने माझ्या कामाची दखल घेऊन मला सन्मानित केल्याबद्दल त्यांचे मनापासून आभार! भारताचे माजी पंतप्रधान, आमच्या पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष एच. डी. देवेगौडा जी यांच्या अमूल्य मार्गदर्शनाखाली मी आजवर काम करत आलो. इथून पुढेही करत राहीन. या सन्मानानंतर माझी जबादारी आणखी वाढल्याचे मला भान आहे. यामुळे मिळालेली प्रचंड ऊर्जा घेऊन जनसामान्यांच्या हितासाठी मी आणखी जोमाने काम करत राहीन.)
नाथाभाऊ शेवाळेजनता ,महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष जनतादल सेक्युलर पक्षाचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष