मृत तनिषा भिसे यांच्या मृत्यूस करणीभूत असणाऱ्या मंगेशकर रुग्णालयावर कारवाई करावी अन्यथा राज्यभर आंदोलन करणार
शिरूर,प्रतिनिधी
पुणे येथील दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाच्या हलगर्जीपणामुळे व मुजोरपणामुळे तनिषा भिसे या भगिनीचा मृत्यू झाला असून,या धर्मादाय रुग्णालयाच्या मुजोर प्रशासनावर कठोर कारवाई करावी अशी मागणी मातंग समाज महाराष्ट्र, अखिल मातंग समाज चळवळ महाराष्ट्र, भीम मातंग एकता आंदोलन व भीम छावा व लहुजी शक्ती संघटनेच्या वतीने करून,अन्यथा संघटनेच्या वतीने
राज्यभर आंदोलन छेडले जाईल असा इशारा निवेदनाद्वारे देण्यात आला आहे
सकल मातंग समाज महाराष्ट्र, अखिल मातंग समाज चळवळ महाराष्ट्र, भीम छावा संघटना, मातंग एकता आंदोलन व लहूजी शक्ती सेनेच्या वतीने शिरूर तहसील कार्यालय व शिरूर पोलीस स्टेशन यांना निवेदन देण्यात आले.
यावेळी मातंग एकता आंदोलनाचे शिरूर अध्यक्ष सतीश बागवे व बाळासाहेब पाटोळे, भीम आर्मीचे तालुकाध्यक्ष चेतन साठे व शिरूर अध्यक्ष अविनाश शिंदे, अखिल मातंग समाज चळवळीचे संतोष साळवे, सकल मातंग समाज चळवळीचे बाळासाहेब जाधव व रवींद्र खुडे, लहूजी शक्ती सेनेचे शहराध्यक्ष सोनूभाऊ काळोखे उपस्थित होते.
पुणे येथील दीनानाथ मंगेशकर धर्मादाय रुग्णालयात, तनिषा सुशांत भिसे यांचा उपचाराअभावी मृत्यू झाल्याने, पुण्यासह सर्वत्र संतापाची लाट पसरलेली असून, सर्वत्र या रुग्णालयाचा निषेध व आंदोलने होत आहेत. रुग्णाच्या नातेवाईकांनी सांगितल्याप्रमाणे या रुग्णालयाने तनिषा भिसे यांना प्रसूतीसाठी ऍडमिट करण्यासाठी तब्बल दहा लाख रुपये अनामत रक्कम मागितली होती. ती संबंधित रुग्णाकडे नसल्याने त्यांनी अडीच लाख रुपये देऊ केले. परंतु तरीही रुग्णालय प्रशासनाने ते मान्य न केल्याने, संबंधित रुग्णास इतर रुग्णालयात जावे लागले व त्यातच तनिषा भिसे यांची वाटेत प्रसूती होऊन, दोन जुळ्या बाळांना जन्म दिला, परंतु तनिषा भिसे यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. तनिषा भिसे यांचे पती सुशांत भिसे हे विधान परिषद आमदार अमित गोरखे यांचे स्विय सहाय्यक आल्याने, त्यांनी मुख्यमंत्री सहाय्यता कक्षामार्फत प्रयत्न केले, तरीही या रुग्णालयाच्या मुजोर प्रशासनाने सहकार्य केले नसल्याचे रुग्णाच्या नातेवाईकांनी सांगितले. अशा रुग्णालयांवर कडक कारवाई करावी अशी मागणी ही निवेदनात करण्यात आ
ली आहे.