शिरूर पंचायत समिती आढावा बैठक पाणी टंचाईसाठी नाही तर मलाईदार खात्यांच्या कामासाठी...

9 Star News
0

 शिरूर पंचायत समिती आढावा बैठक पाणी टंचाईसाठी नाही तर मलाईदार खात्यांच्या कामासाठी... 


शिरूर दिनांक प्रतिनिधी 

          शिरूर तालुक्यात  ग्रामपंचायत आढावा बैठक शिरूर पंचायत समितीचे गट विकास अधिकारी महेश डोके यांनी आमदार ज्ञानेश्वर उर्फ माऊली कटके यांच्या उपस्थितीत बोलवली असून, ही ग्रामपंचायत आढावा बैठक नक्की कशासाठी याबाबतचा कुठेही खुलासा त्यांनी केला नसल्याने ही बैठक म्हणजे नेहमीप्रमाणेच केवळ फार्स असल्याचे बोलले जात तर ही बैठक पाणीटंचाईसाठी असावी असा सगळ्यांचा समज होता परंतु त्यासाठी नसून मलईदार खात्याच्या कामाबद्दल होती.

         शिरूर तालुक्यात सध्या वाढत्या उन्हामुळे अनेक गावांचे असणाऱ्या विहिरी यांनी तळ गाठला असून, अनेक तलाव सुकन्याच्या परिस्थितीत आहे. यावेळी मात्र स्थानिक आमदार ज्ञानेश्वर कटके यांनी लक्ष घालणं गरजेचे आहे. परंतु तशी परिस्थिती आज तालुक्यात दिसत नाही. तर शिरूर तालुक्यात 42 गावातही तीच परिस्थिती असून अनेक तलावांनी तळ गाठला असून पाणी संपण्याच्या स्थितीत आहे तर विहिरींनीही तळ गाठला आहे. या परिस्थितीमध्ये शेतीला पाणीपुरवठा कमी होत आहे तर पिण्याचा पाण्याची मोठी टंचाई निर्माण होताना दिसत आहे. याबाबत या 42 गावातील आमदार दिलीपराव वळसे पाटील यांनाही काही देणेघेणे नसल्याचे दिसून येत आहे. 

        पाणीटंचाई बरोबर शेतीला पाणी नसल्याने ऊस व इतर शेती पिकांचे नुकसान होत आहे व यापुढील काळामध्ये मोठ्या प्रमाणात जनावरांच्या चाऱ्यांचा प्रश्न भेडसावणार आहे. या काळात शेतकरी व जनावरे जगली पाहिजे याकडे स्थानिक आमदार ज्ञानेश्वर कटके व आंबेगाव चे आमदार दिलीपराव वळसे पाटील व शिरूर पंचायत समिती गटविकास अधिकारी महेश डोके यांना कुठलेही देणे घेणे नसल्याचे दिसून येत आहे. त्यात शिरूर तालुक्यातील पाबळ व कान्हूर मेसाई या दोन्ही गावांनी व त्यांच्या वाड्यावर त्यांनी पाण्याची मोठी पाणीटंचाई सुरू असताना टँकर देण्याचा प्रस्ताव शिरूर पंचायत समिती गट विकास अधिकारी यांना दिला आहे. परंतु हा प्रस्ताव प्रामुख्याने तात्काळ मंजूर करणे गरजेचे असताना यात दोन्ही आमदारांनी लक्ष न घातल्याने या गावांना पाहणी केली जाईल नंतर तहसीलदारांकडे पंचायत समितीकडून प्रस्ताव जाईल त्यानंतर जिल्हाधिकारी यांच्याकडे हा प्रस्ताव मंजुरीला जाईल व त्यानंतर या गावांना पाणी मिळेल पाण्याचा टँकर मिळेल असे शिरूर पंचायत समितीच्या वतीने सांगितले आहे. 

           एकीकडे पाणी टंचाईची झळ शिरूर तालुक्यातील सर्वच गावांना बसत असताना मात्र शिरूर पंचायत समिती ग्रामपंचायत आढावा बैठक नक्की कशासाठी हा संशोधनाचा विषय झाला आहे.

        परंतु ही बैठक पाणीटंचाई वाढत्या उन्हामुळे शेतकऱ्यांच्या पिकाच्या व जनावरांच्या चारासाठी असावी असा सर्वांचा भास होता परंतु ही बैठक म्हणजे रस्ते व मलाईदार खात्यांच्या कामासाठी असल्याने सर्वांची नाराजी पसरली आहे.

         या बैठकीमध्ये प्रशासनाला नक्की काय सांगायचे आहे स्थानिक लोकप्रतिनिधींना नक्की काय सांगायचे आहे खरं तर या काळामध्ये पाणीटंचाईसाठी आढावा बैठक घेणे गरजेचे होते परंतु ही बैठक नक्की कशासाठी व कोणत्या कारणासाठी आहे हे करणे अवघड झाले आहे. मात्र ही बैठक म्हणजे केवळ फार्स असल्याचे बोलले जात आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा (0)

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!