शिरूर शहरात लक्ष्मी माता मंदिरासह शहरातील हनुमान मंदिरात हनुमान जयंती सोहळा मोठ्या उत्साहात साजरा...
शिरुर दिनांक (वार्ताहर )
शिरुर शहरातील श्री लक्ष्मी माता श्री महादेव मंदिर येथे मोठ्या उत्साहात हनुमान जयंती सोहळा मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. तर शहरातील विविध भागात हनुमान मंदिरामध्ये हनुमान जयंती साजरी करण्यात आली.
यावेळी भाविकांना महाप्रसादाचेही वाटप करण्यात आले.
आणि परिसरात हनुमान जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली .हनुमान जयंतीनिमित्त अनेक मंदिरात महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते .
यावेळी ” राम लक्ष्मण जानकी, जय बोलो हनुमान की जय ” च्या जयघोष करण्यात आला .
लक्ष्मी माता मंदिर व श्री महादेव मंदिर येथे सदय सेवार्थ सोशल फाउंडेशन यांच्यावतीने हनुमान जयंती सोहळा मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.
यावेळी भूषण रणदिवे, दिनेश कळमकर, मुकुंद ढोबळे, पितांबर चोपडे, प्रताप कुरुंमकर, रोनक सतीजा, उत्कर्ष करपे, शुभम पुजारी, संकेत चोपडा, संतोष मिरजकर,अंकुश तोंडे, तन्मय कालेवार, रमेश दिवटे, योगेश गवळी उपस्थित होते.
शहरातील मारुती आळी मंदिरात हनुमानजन्माचा सोहळा झाला . पूर्व मुख्य हनुमान मंदिर सोनारआळी, हनुमान मंदिर कामाठीपुरा, हनुमान मंदिर तिळवण तेली समाज, हनुमान मंदिर पांजरपोळ, हनुमान मंदिर रामआळी हनुमान मंदिर जोशी वाडी, या शहरतील अनेक हनुमान मंदिरांमध्ये
हनुमान जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली.
हनुमान जयंतीनिमित्त सकाळी मारुती मंदिरातून दिंडी निघाली ही दिंडी राम आळीतील कुंटे यांचे मारुती मंदिर व समस्त नामदेव शिंपी समाज राम मंदिर ,नाईकवाडा येथील मारुती मंदिर या ठिकाणी गेली. यावेळी भाविकाना प्रसादाचे वाटप करण्यात आले . दिंडीची सांगता मारुती मंदिरात झाली. ,तिळवण तेली समाज मारुती मंदिर मुंबई बाजार येथील हनुमान मंदिर येथे ही दिंडी , भजन , जन्मोत्सव व महाप्रसादाचा कार्यक्रम झाला . गोरक्षण पांजरापोळ येथील मारुती मंदिर , बजरंगबली मंदिर जोशीवाडी ,सोनार आळी तील पूर्वमुखी हनुमान मंदिर ,याठिकाणी ही हनुमान जयंतीनिमित्त धार्मिक कार्यक्रम व महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते.