करडे ता.शिरूर येथे थांब तुला गोळ्याव घालतो.. पैशाला लय दिवस थांबवलं असे म्हणून पिस्तूल रोखून जीवे मारण्याचा प्रयत्न केल्या प्रकरणी एकावर गुन्हा
शिरूर प्रतिनिधी
करडे ता शिरूर येथे जमिनीचे व्यवहारातील पैसे नदिल्याचे रागातून एकावर पिस्तूल रोखून थांब तुला गोळ्या घालतो पैशाला लय दिवस थांबवलं असे म्हणून जिवे मारण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी एकावर शिरूर पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत महेश दत्तात्रय रोडे (वय ४१ वर्ष, धंदा, रा. करडे ता.शिरूर जि पुणे)यांनी फिर्याद दिली आहे.
याप्रकरणी दिपक संपत नवले (रा करडे ता शिरूर जि पुणे)याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत शिरूर पोलिसांनी दिलेली माहिती पुढील प्रमाणे फिर्यादीच्या फिर्यादीवरून दिनांक १२ एप्रिल २५ रोजी सकाळी दहा वाजण्याच्या सुमारास करडे ता शिरूर येथे फिर्यादीच्या घरासमोर उभा असताना दिपक नवले याने जमीनीचे व्यवहाराचे राहीलेले पन्नास हजार रुपये नदिल्याच्या कारणावरून चिडुन जावुन त्याने हातात पिस्तुल घेवुन येवुन "थांब तुला गोळ्या घालतो मारूनच टाकतो, तु पैशाला लय दिवस थांबवलय" असे बोलुन त्याचे हातातील पिस्तुल मागेपुढे ओढुन माझे छातीवर धरून मला जिवे ठार मारण्याच्या उद्देशाने पिस्तुलचा खटका ओढला त्यावेळी मी त्याचा हात बाजुला ढकलला त्यामुळें वाचलो आहे.
याबाबत फिर्यादीवरून शिरूर पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास शिरूर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक संदेश केंजळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक सागर शेळके करीत आहे.