शिरूर विद्याधाम प्रशालेच्या गेट बाहेरच्या आठवणीतल्या गोळ्या बिस्किटवाल्या लांडे आजी... यांचे निधन
शिरूर प्रतिनिधी (धीरज शर्मा)
शाळेत गेलो आणि मधली सुट्टी झाली की मग आपली पाऊल निघायची ती त्या गेटच्या बाहेर चिंचेच्या झाडाखाली असलेल्या आजीबाईचा हातगाडी कडे आणि मग सुरू होत असे आपली खरेदी मग 25 पैसे 50पैसे किंव्हा 1 रुपया. बोरकुट, उलटा पुलता, लाल मुख, समोसे, चकली, चिंच, असे अनेक प्रकार चे खाऊ आपल्याला या लांडे आजी बाई उपलब्ध करून देत होत्या.
साधारण व्यक्ती मत्व पण सतत हसत मुख कधी कोणाला चिडल्या किंव्हा रागवल्या असतील असे तर मला आठवतच नाही. सकाळी 10 ते सायंकाळी 5.30 वाजेपर्यंत एकाच जागेवर आपल्या वर प्रेम व्यक्त करण्या साठी आपल्या वर लक्ष देण्या साठी कधी लवकर घरी निघून जात असेल तर किंव्हा शाळेत यायला उशीर झाला तर (काय आज का उशीर झाला आजारी आहे का?) विचारणा करणारी अशी ही माऊली जणू सगळ्यांची खरी आजीच. अशी आजी बाई ज्यांनी आपल्याला शालेय जीवनात खाऊ म्हणजे काय याची खरी ओळख करून दिली अश्या आजी सर्वांचा नशिबात नाही अश्या या आजी बाई म्हणजेच मातोश्री श्रीमती अनुसया सोन्याबापू लांडे वयाच्या 95 वर्षी अल्पशा आजाराने आज पहाटे दुःखद निधन झालं . भगवंत या आत्म्यास चीर शांती देवो हिच प्रभु श्रीराम चरणी प्रार्थना. भावपुर्ण श्रद्धांजली 🙏
शोकाकुल - विद्याधाम प्रशाला चे असंख्य विद्यार्थी सन 1990 ते 2010 बॅच.
काल आजींचे निधनाची पोस्ट पाहिली आणि अनेकांच्या शालेय जीवनातील अविभाज्य भाग म्हणून गोळ्यावाल्या लांडे आजी कायम आठवणीत असायच्या मधल्या काळात त्यांचा विसर पडला होता परंतु शाळेच्या आठवणी निघाल्या की त्यांची आठवण प्रत्येक विद्यार्थी विद्यार्थिनींना नक्की होणार व होत आहे.
त्यांचे नावही कोणाला माहिती नव्हते काहींना फक्त लांडे आडनाव माहिती होते. श्रीमती अनुसया सोन्याबापू लांडे असे त्यांच्या नावाची ओळख आज झाली. आणि ९५ वर्षी त्यांचे निधन झाले.
या आजींना भावपूर्ण श्रद्धांजली.शोकाकुल - विद्याधाम प्रशाला चे असंख्य विद्यार्थी सन 1990 ते 2010 बॅच.
शब्दांकन - धीरज शर्मा शिरूर.
त्यांच्या मागे मुले,नातवंडे, सुना असा मोठा परिवार आहे. शिरूर येथे प्रसिद्ध गुरुदत्त अगरबत्तीवाले दशरथ लांडे व संभाजी लांडे यांच्या त्या मातोश्री होत.