शिरू
शिरूर मध्ये महिलेची २१ लाख ४५ हजाराची फसवणूक केल्याप्रकरणी एकावर गुन्हा.. जास्त वेळ देणाऱ्या एफडी व नवीन पॉलिसी करून देतो सांगून केली फसवणूक
शिरूर दिनांक प्रतिनिधी
शिरूर रामलिंग येथील महिलेला बँकेत जास्त वेळ देणारे एफडी व नवीन पॉलिसी करून देतो म्हणून महिलेची २१ लाख ४५ हजार रुपयाची फसवणूक केल्याप्रकरणी एकावर शिरूर पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत कल्पना अंकुश ढोरमले (वय 50 वर्शे, व्यवसाय गृहिणी, रा. रामलिंग रोड, ओम रूद्रा कॉलनी, रूम नं 1296, शिरूर, जि. पुणे) यांनी फिर्याद दिली आहे.
. याप्रकरणी विकास गुलाब बेलदार (रा. लक्ष्मीनारायण नगर, चरोली, पुणे) याच्यावर फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत शिरूर पोलिसांनी दिलेली माहिती पुढील प्रमाणे फिर्यादीच्या फिर्यावरून दिनांक 2022 पासून ते डिसेंबर 2024 या कालावधीमध्ये स्टेट बँक ऑफ इंडिया शिरूर शाखा या ठिकाणी येउन एसबीआय लाईफ इन्षुस्न्सचे काम पाहणारा विकास गुलाब बेलदार (रा. लक्ष्मीनारायण नगर, चरोली, पुणे) याने मला बँकेच्या व्याजदरापेक्षा जास्त व्याजदर देणा-या एफ.डी. व नवीन पॉलीसी सुरू करून देतो असे खोटेनाटे सांगून माझेकडून एकूण सहा ब्लॅक चेक माझे सहीसह घेतले. माझे नावे त्याने सांगितलेप्रमाणे कोणतीही एफ. डी. अथवा नवीन पॉलीसी चालू न करता मला खोटया पावत्या देऊन नवीन पॉलीसी व एफ. डी. चालू केल्याचे भासवले. आणि वेळोवेळी माझे परस्पर मी विश्वासाने दिलेले चेक वटवून माझे बँक खाते क्र. 35554265989 यावरून स्वतःच्या बँक खाते क्र. 33881261294 यावर २१ लाख ४५ हजार रुपये जमा करून घेऊन माझी आर्थिक फसवणूक केली. फिर्यादीवरून शिरूर पोलीस स्टेशन येथे फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास शिरूर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक संदेश केंजळे यांच्या मार्गदर्शनाखाली महिला पोलीस उपनिरीक्षक माधुरी झेंडगे करीत आहे.