शिरूरमध्ये देवदूत अवतरले! गरीब वीटभट्टी कामगाराच्या मुलाला मोफत उपचार देत सुखायू हॉस्पिटल डॉ. अमित कुमार व डॉ. संकेत घोडे यांनी वाचवले लाखमोलाचे प्राण
शिरूर प्रतिनिधी
शिरूर शहरातील सुखायू चाइल्ड केअर हॉस्पिटलमधील बालरोगतज्ज्ञ डॉ. अमित कुमार आणि डॉ. घोडे यांनी एका गरीब वीटभट्टी कामगाराच्या नुकत्याच जन्मलेल्या मुलाला मोफत उपचार करून त्याचे प्राण वाचवले. त्यांच्या या कार्यामुळे या डॉक्टरांना देवदूत म्हटले जात आहे.
शिरूर येथील डॉ. संतोष पोटे यांच्या हॉस्पिटलमध्ये कल्पना किशोर पवार या वीटभट्टी कामगार महिलेला प्रसूती वेदनांमुळे दाखल करण्यात आले. सिजरीन करायची असल्याने डॉक्टरांनी तिच्या वडिलांना सांगितले. महिलेच्या वडिलांनी आपल्याजवळ पैसे नसलेचे सांगून, मोफत डिलिव्हरी करण्याची विनंती डॉ. पोटे यांना केली. त्यांची गरीब परिस्थिती पाहून डॉ. पोटे यांनी मोफत प्रसूती करण्याचे ठरवले.
प्रसूतीनंतर महिलेने एका गोंडस बाळाला जन्म दिला, परंतु बाळ prematurity मुळे श्वसन घेण्यास त्रास घेत होते. त्यामुळे त्याला तातडीने डॉक्टरांकडे उपचारासाठी हलवण्यात आले.
डॉक्टरांनी बाळाला व्हेंटिलेटरवर ठेवण्याचा सल्ला दिला, तसेच बाळाच्या जगण्याची शक्यता कमी असल्याचे आणि उपचारांचा खर्च खूप जास्त असल्याचे सांगितले. गरीब कामगारांना हा खर्च परवडणारा नव्हता आणि तरीही बाळाच्या वाचण्याची खात्री नव्हती.
बाळाची गंभीर अवस्था पाहून डॉक्टरांनी त्याच्या आजोबांना सर्व परिस्थिती समजावून सांगितली आणि पुढील उपचारांसाठी पुण्यातील ससून हॉस्पिटलमध्ये घेऊन जाण्याचा सल्ला दिला. मात्र, तिथेही बेड मिळेल की नाही याची चिंता बालरोगतज्ज्ञ डॉ. कुमार व डॉ. घोडे यांना होती.
परिस्थिती ऐकून हतबल झालेले आजोबा रडू लागले. त्यांच्याकडे पुण्याला जाण्यासाठी पैसेही नव्हते. डॉक्टरांनी रुग्णवाहिकेची व्यवस्था करून देण्याची तयारी दर्शवली, पण पैशांशिवाय पुण्यात काय करायचे, हा प्रश्न त्यांच्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसत होता.
त्यावेळी सुखयू हॉस्पिटलचे डॉ. कुमार आणि डॉ. घोडे यांनी मोठे मन दाखवले. त्यांनी आजोबांना धीर देत सांगितले की ते बाळाला व्हेंटिलेटरवर ठेवून उपचार करतील आणि यासाठी कोणताही खर्च घेणार नाहीत. त्यांनी आपले सर्वोत्तम प्रयत्न करण्याचे आश्वासन दिले आणि सर्व काही देवावर सोडले. डॉ. संतोष पोटे यांनीही डॉक्टरांना उपचारासाठी प्रोत्साहन दिले.
डॉक्टरांच्या या आश्वासनामुळे आजोबांच्या डोळ्यांतील अश्रू आनंदाश्रूंमध्ये बदलले. डॉक्टरांनी तातडीने उपचार सुरू केले आणि काही दिवसांतच बाळाच्या प्रकृतीत सुधारणा झाली. पाच दिवसांत बाळ पूर्णपणे निरोगी झाले आणि त्याच्या आई-आजोबांना मोठा दिलासा मिळाला.
सहाव्या दिवशी डॉक्टरांनी बाळाला घरी सोडण्याचा निर्णय घेतला. त्यावेळी बाळाच्या आजोबांनी डॉक्टरांचे हात हातात घेऊन कृतज्ञतेने अश्रू ढाळले. डॉ. अमित कुमार आणि डॉ. संकेत घोडे यांच्या रूपात त्यांना देवदूत भेटल्याचा अनुभव आला होता.
बाळामध्ये मेकोनिअम ॲस्पिरेशनमुळे गंभीर श्वसन आणि ॲस्फिक्सियाची समस्या होती. त्याला त्वरित दाखल करून व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले. बाळ तीन दिवस व्हेंटिलेटरवर होते आणि यशस्वी उपचारानंतर त्याला डिस्चार्ज मिळाला. सुश्रुत हॉस्पिटलमधील प्रशिक्षित नर्सिंग स्टाफ आणि डॉक्टरांचे हे महत्त्वपूर्ण योगदान आहे.
डॉ. अमित उदय कुमार व डॉ. संकेत विलास घोडे, सुखायू हॉस्पिटल, शिरूर छत्रपती कॉलनी, शिरूर
एकीकडे मंगेशकर रुग्णालया सारखी पैशासाठी महिलेचा जीव जात असताना परिस्थिती पाहत असताना दुसरीकडे समाजात काही असेही डॉक्टर आहे की जे प्रत्येक वेळी पैसा महत्त्वाचा नसून, सामाजिक बांधिलकी ही महत्त्वाची आहे हे समजून उपचार करीत आहे. अशा वैद्यकीय क्षेत्रातील डॉक्टरांना सलामच!