शिरूर येथून गहाळ झालेले 35 मोबाईल मूळ मालकांना परत - संदेश केंजळे पोलिस निरीक्षक
शिरूर प्रतिनिधी
शिरूर पोलिस स्टेशन हद्दीतून गहाळ झालेल्या मोबाईल पैकी ३५ मोबाईल फोन किंमत ६ लाख ८६ हजार रुपयांचे शिरूर पोलिस स्टेशनच्या पोलिस पथकाने परराज्यातून व इतर जिल्ह्यातून शोधुन मूळ मालकांना परत केले असल्याची माहिती शिरूर पोलीस निरीक्षक संदेश केंजळे यांनी दिली आहे.
गहाळ झालेले मोबाईल नागरिकांना (मालकांना) मिळाल्याने शिरूर पोलीस स्टेशन शोध पथकांचे अभिनंदन केले आहे.
शिरूर पोलीस स्टेशन हद्दीतून शिरूर बाजार पेठ, शिरूर बस स्थानक सह विविध ठिकाणी गहाळ झाले होते.
याबाबत शिरूर पोलीस स्टेशन येथे गहाळ रजिस्टरला नोंद झाली होती. मोठ्या प्रमाणात मोबाईल गहाळ होत असल्याने याचा तपास शिरूर पोलिस स्टेशन तपास पथकाने करण्याचे आदेश देण्यात आल्याने तपास पथकाचे पोलीस उपनिरीक्षक शुभम चव्हाण व पोलिस कॉन्स्टेबल विजय शिंदे यांनी मोबाईल ट्रेसिंगला लावून २०२४ ते २५ दरम्यान गहाळ झालेले मोबाईल ट्रेस करून परराज्यातून व परजिल्ह्यातून परत मिळवून आज ३५ मोबाईल सहा लाख 85 हजार रुपयांची मूळ ३५ मालकांना परत केले आहे.
गहाळ झालेले मोबाईल पुन्हा परत मिळत नाही असा समज नागरिकांचा आहे परंतु शिरूर पोलीस स्टेशनच्या पोलिसांनी हे मोबाईल शोधून मूळ मालकांना परत दिल्यामुळे लाख मोलाचा मोबाईल परत मिळाल्याने नागरिकांनी पोलिसांचे आभार मानले आहे.
हा तपास पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षक पंकज देशमुख,पुणे विभाग अप्पर पोलिस अधीक्षक रमेश चोपडे, शिरूर उपविभागीय पोलीस अधिकारी प्रशांत ढोले शिरूर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक संदेश केंजळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उप निरीक्षक शुभम चव्हाण, पोलिस कॉन्स्टेबल विजय शिंदे, पोलिस हवालदार पोलीस अंमलदार निरज पिसाळ,सचिन भोई, नितेश थोरात, विजय शिंदे, निखील रावडे, रविंद्र आव्हाड, अजय पाटील यांचे पोलीस पथकाने केली आहे.
मोबाइल धारकांचे नावे
तन्वीन अन्सारी
राजाबाबु आलम
रघुनाथ धरणे
नंदु पिंजरकर
धर्मा मैड
शिवाजी कुंडलिक
चेतन सरोदे
अमोल बोरकर
राम माने
संभाजी दराडे
शोभा ससे
संजय परगडे
प्रदीप जाधव
निलेश गायकवाड
गणेश खेडकर
प्रल्हाद कारखीले
शिवाजी खेडकर
दिलीप डेरे
शुभांगी मोडवे
जितु गुप्ता
भामाबाई वाळके
कैलास लांघे
स्वप्नील शिंदे
संतोष ताकवणे
विजय शितोळे
राजु सोनवणे
राहुल वंशकाळ
चंद्रकांत माने
श्रावण घोलवड
बापु आढाव
गणेश शेवकर
सार्थक जगदाळे
अशोक मुंजाळ
अभिजीत कदम
मच्छिद्र शिंदे
"