सरदवाडी (ता. शिरूर) उपसरपंच गणेश सरोदे यांनी कन्यारत्नाच्या जन्माचे स्वागत दिव्यांग विद्यार्थ्याला सायकल भेट देऊन अनोख्या पद्धतीने केले!
सरदवाडी (ता. शिरूर) येथील माजी उपसरपंच गणेश सरोदे आणि त्यांच्या पत्नी कोमल सरोदे यांना अलीकडेच कन्यारत्न प्राप्त झाले. आपल्या मुलीच्या जन्माचे स्वागत दिव्यांग विद्यार्थ्याला सायकल भेट देऊन आगळ्या वेगळ्या आणि समाजोपयोगी पद्धतीने करत एक नवा आदर्श निर्माण केला आहे.
या दांपत्याने अभिनव विद्यालय, सरदवाडी येथील इयत्ता ६ वी मध्ये शिकणाऱ्या दिव्यांग विद्यार्थी अमोल बापू गुलदगड याला एक नवी सायकल भेट दिली. अमोल रामलिंग नगर (क-हे वाडा) येथील रहिवासी असून, त्याचे शाळेचे अंतर खूप असल्यामुळे तो दररोज शाळेत येताना अडचणींचा सामना करत होता. ही अडचण लक्षात घेऊन सरोदे दांपत्याने आपल्या कन्येच्या जन्माचे औचित्य साधून अमोलला सायकल भेट दिली.
ही सायकल नुकतीच मान्यवरांच्या उपस्थितीत अमोलला प्रदान करण्यात आली. लाखमोलाची भेट मिळाल्याने अमोलच्या चेहऱ्यावर आनंद ओसंडून वाहत होता.
कार्यक्रमाला उपस्थित मान्यवर:
या प्रसंगी माजी पंचायत समिती सदस्य आबासाहेब सरोदे, माजी उपसरपंच नामदेव सरोदे, सरपंच लक्ष्मीताई जाधव, विद्यालयाचे मुख्याध्यापक दादाभाऊ घावटे, ग्रामपंचायत सदस्य उमेश सरोदे, विद्या सरोदे, शिल्पाताई घावटे, ह.भ.प. बापू महाराज घावटे, युवाउद्योजक गणेश निचित, जिल्हा परिषद शाळेच्या व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष कैलास सरोदे, दीपक सरोदे, रूपेश निरवणे, अनिल घावटे, बाळासाहेब जाधव, हनुमान सरोदे सर, शांताराम खामकर सर, संदीप सरोदे सर, गि-हे मॅडम, सविता रासकर मॅडम, मनिषा पवार मॅडम, रुपाली कदम, आरती शेळके, राणी मांडगे मॅडम, दीपाली शिंदे मॅडम, गजानन गोंजारी सर, भूषण कारकुड सर तसेच शिक्षक, ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाचे प्रस्ताविक विद्यालयाचे मुख्याध्यापक दादाभाऊ घावटे सर यांनी केले, स्वागत संदीप सरोदे सर यांनी केले आणि आभार प्रदर्शन बाळासाहेब जाधव यांनी केले.