शिरूर प्रतिनिधी
न्हावरा ता. शिरूर येथे छत्रपती शिवाजी महाराजस्व अभियान व लोकशाही दिनाचा कार्यक्रमास शेतकरी नागरिक यांचा मोठा प्रतिसाद मिळाला आहे.
या अभियानाच्या अध्यक्षपदी आमदार ज्ञानेश्वर उर्फ माऊली आबा कटके होते.
यावेळी न्हावरे येथे आमदार ज्ञानेश्वर उर्फ माऊली कटके यांच्या जनसंपर्क कार्यालयाचा शुभारंभ झाला.
यावेळी शिरूर उपविभागीय अधिकारी पूनम अहिरे, तहसीलदार बाळासाहेब म्हस्के, पंचायत समिती गट विकास अधिकारी महेश डोके, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे तालुका अध्यक्ष रवी काळे, माजी जिल्हापरिषद सदस्य राजेंद्र जगदाळे, रेखा बांदल श्रीनिवास घाडगे, राजेंद्र कोरेकर, दूध संघाचे अध्यक्ष स्वप्निल ढमढेरे, बाजार समितीचे माजी अध्यक्ष अँड वसंतराव कोरेकर काका,सुधीर फराटे, शहराध्यक्ष शरद कालेवार,तालुक्यातील सर्व विभागांचे प्रमुख अधिकारी उपस्थित होते.
या कार्यक्रमात विविध योजनांचा लाभ प्रातिनिधिक स्वरूपात नागरिकांना देण्यात आला. यामध्ये 20 लाभार्थ्यांना जिवंत सातबारा उतारे, 15 लोकांना नवीन रेशनकार्ड, 15 लाभार्थ्यांना संगायो योजनेअंतर्गत लाभ, कृषी विभागामार्फत कृषी यंत्र वाटप, महिला व बालकल्याण विभागामार्फत बेबी किट वाटप तसेच पंचायत समितीमार्फत घरकुल मंजुरी पत्र देण्यात आले.
कार्यक्रमात उपस्थित नागरिकांच्या विविध तक्रारींचे निवारण त्वरित करण्यात आले. तहसीलदार बाळासाहेब म्हस्के यांनी प्रास्ताविक करून शासनाच्या विविध योजनांची माहिती दिली.
तर उपविभागीय अधिकारी पूनम अहिरे यांनी आपल्या मनोगतातून लोकशाहीच्या बळकटीसाठी असे उपक्रम महत्त्वाचे असल्याचे सांगितले.
या प्रसंगी आमदार ज्ञानेश्वर कटके यांनी शासन जनतेच्या दारात आले असून, नागरिकांची कामे जलदगतीने मार्गी लागावीत यासाठी अधिकारी-कर्मचाऱ्यांनी तत्परतेने काम करावे, असे स्पष्ट शब्दांत सांगितले.
या कार्यक्रमाला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. शिरूर तालुक्यातील सर्व विभागांचे अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. जनतेच्या हितासाठी आयोजित केलेल्या या कार्यक्रमाचे सर्वत्र कौतुक होत आहे.