शिरूर प्रतिनिधी
राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांचा शिरूर तालुक्यातील रांजणगाव औद्योगिक वसाहतीतील महाराष्ट्र एन्व्हारो कंपनीच्या प्रदूषणाबाबत असणारा दौरा रद्द झाला असून, काही तांत्रिक अडचणीमुळे हा दौरा रद्द झाल्याचे बोलले जात आहे.
दिनांक २३ एप्रिल रोजी सकाळी राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांचा दौरा ठरला होता. परंतु हा दौरा गोपनीय असल्याचे बोलले जात आहे. परंतु काही अतिउच्चाही लोकांनी या दौऱ्याबाबत वाचता लवकर केल्यामुळे व याबाबतच्या बातम्या सर्व ठिकाणी प्रसारित झाल्यामुळे महाराष्ट्र एन्व्हारो कंपनीच्या अधिकाऱ्यांना जाग आली. देशाचा एवढा मोठा नेता या कंपनीच्या प्रदूषणाचा पर्दाफाश करणार याची जाणीव कंपनी व्यवस्थापनाला झाली.
आणि कंपनी व्यवस्थापन्याने अनेक ठिकाणी दोन दिवसात मुरूम टाकून आणि प्रदूषण होत असलेल्या जागा बुजवली आहे. अनेक ठिकाणी काही झालेच नाही असे दाखवण्याचा प्रयत्न कंपनी व्यवस्थापनाने केला असल्याचे बोलले जात आहे.
ही बाब लक्षात येताच याची गंभीर दखल घेत हा राष्ट्रवादीचे शरद पवार यांचा दौरा अचानक रद्द करण्यात आला आहे.
जरी हा दौरा रद्द केला असला तरी अचानक केव्हाही हा पाहणी दौरा होऊ शकतो. त्यावेळेस मात्र
महाराष्ट्र एन्व्हारो कंपनीच्या प्रदूषणाचा पर्दाफाश देशभर होईल हे मात्र नक्की खरे आहे.
तर उद्या शिरूर लोकसभेचे खासदार डॉ. अमोल कोल्हे व खासदार नीलेश लंके हे याभागाचा दौरा करणार आहे.