शिरूर शहरात सराफावर फायरिंग करणारा व सात गंभीर गुन्हे असणारा सराईत गुन्हेगार शरद मल्लाव वर्षासाठी स्थानबद्ध - संदेश केंजळे पोलीस निरीक्षक

9 Star News
0

शिरूर शहरात सराफावर फायरिंग करणारा व सात गंभीर गुन्हे असणारा सराईत गुन्हेगार शरद मल्लाव एक वर्षासाठी स्थानबद्ध - संदेश केंजळे पोलीस निरीक्षक

 


शिरूर,प्रतिनिधी

     शिरूर शहरात सराफावर फायरिंग करून तसेच गावठी पिस्तुल जवळ बाळगुन गंभीर स्वरूपाचे सात गुन्हे करणारा व दहशत करणारा सराईत गुंडास एम पी डी ए खाली एक वर्षासाठी स्थानबद्ध केले असल्याची माहिती शिरूर पोलीस स्टेशनची पोलीस निरीक्षक संदेश केंजळे यांनी दिली आहे.

       शरद बन्सी मल्लाव (वय २५वर्षे काचीआळी शिरूर ता. शिरूर जि. पुणे ) असे स्थानबद्ध केलेल्या आरोपीचे नाव आहे.

        ही कार्यवाही पुणे ग्रामीण पोलीस अधिक्षक पंकज देशमुख यांचे शिफारशीवरून पुणे जिल्हाधिकारी यांनी शरद मल्लाव याला MPDA कायदयाखाली स्थानबध्द केले असून, शिरूर पोलीस स्टेशन व पुणे ग्रामीण जिल्हयातील वर्षातील पहीली धडाकेबाज कारवाई आहे.

      शिरूर पोलीस स्टेशन सराईत गुंड गुन्हेगार शरद  मल्लाव हा सराईत गुन्हेगार असून, त्यावेविरुध्द शिरूर पोलीस ठाणे, रांजणगाव पोलीस ठाणे व पाली पोलीस ठाण्यात जि. रायगड हददीमध्ये बेकायदेशिर पिस्तूल बाळगणे, गंभीर दुखापत करणे, खुनाचा प्रयत्न करणे, जबरी चोरी करणे किंवा दरोडा घालण्याचा प्रयत्न, फायरिंग करणे अशा प्रकारचे सात गुन्हे दाखल असून,शरद मल्लाव यास कायदयाचे कुठलेही भय कायदयाचा वचक त्याचेवर राहीलेले नाही व नव्हता तो लागोपाठ गुन्हेगारी वर्तन करीत आहे. तर त्याला या अगोदर हद्दपार केले असतानाही त्याने गुन्हे केले असल्याने शिरूर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक संदेश केंदळे यांनी त्याचा एम पी डी ए अंतर्गत स्थानबद्धतेचा प्रस्ताव पुणे पोलीस अधीक्षक व पुणे जिल्हा अधिकारी यांच्याकडे पाठवला असून तो मंजूर करून त्याला एक वर्षासाठी स्थानबद्ध करण्यात आले आहे.

 त्याला एम पी डी ए अंतर्गत स्थानबद्ध केली असून त्याची रवानगी मध्यवर्ती कारागृह आकोला जि. आकोला येथे करण्यात आले आहे.

         सराईत गुन्हेगार शरद  मल्लाव याचेवर ठोस प्रतिबंधक कार्यवाही करून त्यास स्थानबध्द करणे करीता पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षक पंकज देशमुख, पुणे विभाग अप्पर पोलिस अधीक्षक रमेश चोपडे, शिरूर उपविभागीय पोलीस अधिकारी प्रशांत ढोले, पोलीस निरीक्षक संदेश केंजळे, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अविनाश शिळीमकर यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक शुभम चव्हाण, स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे सहा फौजदार महेश बनकर, पोलीस हवालदार मंगेश थिगळे, शिरूर पोलीस ठाण्यावे पोलीस हवालदार परशराम सांगळे व पोलीस अमंलदार सचिन भोई, पोलीस हवालदार नाथसाहेब जगताप, पोलीस अमंलदार नितेश थोरात, अजय पाटील, विजय शिंदे, निखील रावडे, रविंद्र आव्हाड, निरज पिसाळ यांनी कामकाज पाहीले आहे.

Tags

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा (0)

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!