शिरूर जवळील गव्हाणेवाडी ,दाणेवाडी येथील मंगळसूत्र चोरांच्या मुसक्या आवळल्या पुणे ग्रामीण गुन्हे अन्वेषण शाखेची कार्यवाही - अविनाश शिळीमकर पोलीस निरीक्षक
शिरूर दिनांक प्रतिनिधी
शिरूर शिक्रापूर जुन्नर आळेफाटा परिसरात पायी चालणाऱ्या महिलांच्या गळ्यातील सोन्याचे मंगळसूत्र ओढून जबरीचोरी करणाऱ्या सराईत गुन्हेगारांना पुणे ग्रामीण गुन्हे शाखेच्या पथकाने पकडले असून त्यांच्याकडून सात लाख १७ हजार ७९३ रुपयांचा पावणे नऊ तोळ्याचा सोन्याचा ऐवज जप्त करण्यात आला आहे.
पुणे ग्रामीण गुन्हे अन्वेषण विभागाच्या पथकाचे जुन्नर शिरूर तालुक्यातून महिला वर्गातून अभिनंदन होत आहे.
आरोपींनी जुन्नर परिसरात दोन गुन्हे, शिक्रापूर परिसरातही गुन्हा, शिरूर परिसरात एक गुन्हा, तर आळेफाटा परिसरातील गुन्हा केल्याची कबुली दिली आहे. शिरूर पोलिसांनी दोन दिवसांपूर्वी दोन आरोपी अटक करून पाच गुन्हे उघडीस आणले त्यानंतर दोनच दिवसात पुणे ग्रामीण गुन्हे शाखेच्या पथकाने दोघा जणांना अटक करून मंगळसूत्र चोरीचे पाच गुन्हे उघड केले आहे त्यामुळे मंगळसूत्र चोरांची धाबे दणाणले आहे.
अनिल सोमनाथ गव्हाणे (वय ३१ वर्षे, रा. गव्हाणेवाडी ता. श्रीगोंदा जि अहिल्यानगर),अनिल नारायण गव्हाणे (वय २५ वर्षे रा. दाणेवाडी ता. श्रीगोंदा जि अहिल्यानगर) यांना पोलिसांनी अटक केली आहे.
शिरूर , शिक्रापूर आळेफाटा जुन्नर परिसरात मोठ्या प्रमाणात महिलांचे मंगळसूत्र ओढणारी टोळी सक्रिय झाली होती. यामुळे अनेक महिला यामध्ये जखमी होऊन सोन्याचे मंगळसूत्र ही चोरी गेल्याच्या घटना घडल्याने पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षक पंकज देशमुख, पुणे विभाग अप्पर पोलीस अधीक्षक रमेश चोपडे यांनी या गुन्ह्यांचा तपास करण्याचे आदेश पुणे ग्रामीण गुन्हे अन्वेषण शाखेला दिले होते.
याबाबतची गंभीर दखल गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक अविनाश शिळीमकर यांनी घेतली होती. दिनांक ११ मार्च रोजी जुन्नर तालुक्यातील पिंपळगाव सिद्धनाथ ते गणेश खिंड रोडने जुन्या घराकडे पायी जात असताना इंदुबाई विठ्ठल पानसरे यांच्या गळ्यातील सोन्याचे मंगळसूत्र माळ दोघा चोरट्यांनी बळजबरीने चोरून नेली होते. याबाबत फिर्याद दाखल झाल्याने पोलीस निरीक्षक अविनाश शिळीमकर यांनी स्थानिक गुन्हे शाखेचे पथकाला या गुन्ह्याचा तपास करण्याचे आदेश दिले होते या गुन्ह्याच्या तपासा दरम्यान अनेक सीसीटीव्ही कुठे तपासण्यात आले तर चोरट्यांनी गुन्हा करते वेळेस स्प्लेंडर मोटर सायकल वापरली होती ती शिरूरच्या बाजूने गेली असल्याचे तपासात निष्पन्न झाले .याबाबत गुन्हे अन्वेषण विभागाच्या पथकाने या स्प्लेंडर मोटार सायकलची माहिती गोपनीय माहिती दाराकडून काढली. ही मोटर सायकल गव्हाणवाडी येथील अनिल गव्हाणे व दाणेवाडी येथील अनिल गव्हाणे हे दोघं वापरत असल्याचे समजले. हे दोघे शिरूर येथे असल्याचे समजल्यानंतर गुन्हे शाखेचे पथक स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस उपनिरीक्षक अभिजीत सावंत, जुन्नर पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक अरविंद गटकुळ, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस अंमलदार पोलीस अंमलदार दिपक साबळे, संदिप वारे, अक्षय नवले, तुषार पंदारे, जनार्दन शेळके, संजू जाधव, राजु मोमीण, सागर नामदास, वैभव सावंत, निलेश सुपेकर यांनी शिरूर शहरात सापळा रचून दोन्ही अनिल गव्हाणे यांना अटक केली त्यांच्याकडून सखोल चौकशी दरम्यान त्यांनी गुन्ह्याची कबुली देऊन जुन्नर बरोबर आळेफाटा शिरूर शहर शिक्रापूर या ठिकाणी अशा प्रकारच्या महिलांच्या गळ्यातील सोन्याचे दागिने मंगळसूत्र ओढल्याचे गुन्हे केल्याचे सांगितले. त्यांच्याकडून आठ डोळे आठ ग्रॅम सोने किंमत ७ लाख १६ हजार ७९३ रुपयाचे जप्त केले असून दोन्ही चोरट्यांना जुन्नर पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे पुढील तपास जुन्नर पोलीस स्टेशन करीत आहे.
ही कार्यवाही
पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षक पंकज देशमुख, पुणे विभाग अप्पर पोलीस अधीक्षक रमेश चोपडे, यांचे मार्गदर्शनाखाली परी. उपविभागीय पोलिस अधिकारी भाग्यश्री धीरबस्सी, पुणे ग्रामीण स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अविनाश शिळीमकर, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस उपनिरीक्षक अभिजीत सावंत, जुन्नर पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक अरविंद गटकुळ, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस अंमलदार पोलीस अंमलदार दिपक साबळे, संदिप वारे, अक्षय नवले, तुषार पंदारे, जनार्दन शेळके, संजू जाधव, राजु मोमीण, सागर नामदास, वैभव सावंत, निलेश सुपेकर यांनी केली.