शिरूर तालुका प्राथमिक शिक्षक पतसंस्थेच्या मनमानी कारभारा विरोधात शिक्षक संघाचा सामुहिक उपोषणाचा इशारा
शिरूर प्रतिनिधी
शिरूर तालुका प्राथमिक शिक्षक पतसंस्थेचा मनमानी कारभार याची चौकशी करून संबंधित यांच्यावर कारवाई करावी अन्यथा शिरूर तालुका प्राथमिक शिक्षक संघाच्या वतीने दिनांक १६ एप्रिल रोजी शिरूर सहाय्यक निबंध कार्यालयासमोर लाक्षणिक उपोषण करण्यात येणार असल्याचा इशारा निवेदनाद्वारे देण्यात आला आहे.
याबाबतचे निवेदन शिरूरचे सहाय्यक निबंधक अरुण साकोरे यांना देण्यात आले आहे.
यावेळी पुणे जिल्हा प्राथमिक शिक्षक संघाचे कोषाध्यक्ष माऊली पुंडे, एकल शिक्षक संघटनेचे राज्य कार्याध्यक्ष दादाभाऊ खेसे, जिल्हा सहचिटणीस सोमनाथ गायकवाड, आप्पासाहेब रसाळ, शिक्षक नेते संतोष शेवाळे, तालुका शिक्षक संघाचे अध्यक्ष संतोष गावडे,शिक्षक पतसंस्था संचालक कैलास गारगोटे, शरद झेंडे, तालुका शिक्षक संघाचे कोषाध्यक्ष आबासाहेब जाधव व विभाग प्रमुख संजयकुमार वाळके उपस्थित होते.
शिरूर तालुका प्राथमिक शिक्षक पतसंस्था तळेगाव ढमढेरे ही संस्था सहकारी संस्थेच्या अधिनियमानुसार व कायद्यानुसार कामकाज करत नसुन खालील विषयावर गांभिर्याने विचार करून आपल्या अधिकारात निर्णय घेवुन सभासदांना न्याय द्यावा यास खालील मागण्या निवेदनात करण्यात आल्या आहेत.
शिरूर तालुक्यात सेवा करून पर तालुक्यात बदलुन गेलेल्या सभासदांना मागणी नुसार कर्ज मिळत नाही. कोर्टाच्या नावाखाली सभासदांमध्ये संभ्रम निर्माण करीत आहे तरी पर तालुक्यातील सभासदांना कर्ज मिळावे.
आपल्या ३१/५/२०२४ च्या आदेशानुसार संचित ठेवीची रक्कम सभासदांच्या कर्ज खात्यात मागणी नुसार जमा करणेत आलेली नाही. सदर रक्कमेचे व्याज सभासदांचे कोणतेही मागणीपत्र न घेता परस्पर कर्ज खात्यात जमा करणेत आलेले आहे.
पतसंस्थेने कार्यक्षेत्राबाहेरील नियमबाहा जे सभासद केले आहे ते आपला आदेश असतानाही अजुन कायम आहेत. त्यांचे सभासदत्व आजतागायत रद्द का करणेत आलेले नाही?
मार्च २०२१ ते एप्रिल २०२२ या कालावधितील आपल्या मान्यतेशिवाय नियमबाह्य चेअरमन व इतर निवडी झालेल्यांची चौकशी अहवाल मिळावा.
पतसंस्था सी.सी.टी.व्ही. व जळीत कांडाबाबत अद्याप पर्यंत अहवाल प्राप्त झालेला नाही.
घटनाबाह्य सभासदांना देण्यात आलेले कर्ज तत्काळ वसुल करणेत यावे.
कलम ७९ (२) च्या ३१/५/२०२४ चा आदेश तसेच विभागिय सहनिबंधक सहकारी संस्था यांचा २८/१०/२०२४ चा आदेश असतानाही आदेशाचे पालन झाले नाही. किंवा सदर निर्णया बाबत कोर्टात स्टे नाही. तरीपण सभासदांमध्ये दिशाभुल करत असून शिरूर तालुका प्राथमिक शिक्षक पतसंस्था मनमाणी कारभार करत आहे याची चौकशी करावी व संबंधितवर कारवाई करावी अन्यथा तालुका प्राथमिक शिक्षक संघाची सभासद सहाय्यक निबंधक कार्यालयासमोर बुधवार दि.१६ एप्रिल २०२५ पासून लाक्षणिक उपोषण
करणार आहे.