शिरूर गुजरमळा शाईन गाडी चोरी... छत्रपती संभाजी नगर पोलिसांचा दंड मात्र मालकाच्या माथी... अजब चोरांची गजब गोष्टी पोलिसांनी चोरावर लावावी आपली दृष्टी अशी म्हणण्याची वेळ आली आहे..
शिरूर दिनांक प्रतिनिधी
शिरूर शहरातून चोरीला गेलेली आकाश चाकणे यांच्या गाडीला छत्रपती संभाजीनगर येथे ऑनलाइन दंड बसला असून या दंडाची पावती व गाडीचा फोटो चाकणे यांना मात्र प्राप्त झाला आहे त्यामुळे अजब चोरांची गजब गोष्टी... यांच्यावर पोलिसांनी ठेवावी आता दृष्टी असे म्हणण्याची वेळ आली आहे.
शिरूर शहरातील आकाश मधुकर चाकणे यांची शाईन दुचाकी गाडी क्रमांक MH 12 WW 2338 ही शिरूर गुजरमाळा येथून दिनांक १६ मार्च २०२५ रोजी रोजी चोरीला गेली होती. महिनाभरानंतर या गाडीचा शोध लागत नव्हता.
परंतु छत्रपती संभाजीनगर येथे मात्र चाकणे यांची दुचाकी गाडी एक व्यक्ती तोंडाला मास्क व पाठीमागे बसलेली महिला अशी जात असताना त्यांनी वाहतुकीचे नियम मोडले म्हणून त्यांना गाडीच्या फोटोसह वाहतूक पोलिसांनी ७ एप्रिल रोजी दुपारी पावणे एकवाजता दंड केला आहे. सदर गाडी पैठण चौक वाळूंज midc संभाजीनगर भागात आहे..
परंतु ही गाडी शिरूर येथील आकाश चाकणे यांच्या मालकीची असल्यामुळे हा दंड व गाडीचा फोटो चाकणे यांना आला आहे.
एक त्यांची दुचाकी चोरीला गेली म्हणून साखरे यांनी शिरूर पोलीस स्टेशन येथे फिर्याद दिली आहे. चोर शोधण्या अगोदर या गाडीला हेल्मेट घातले नसल्यामुळे एक हजार रुपयांचा दंड चाकणे यांच्या माथी पडला आहे.
त्यामुळे चोर तो चोर वर एक हजाराचा दंड शिरजोर झाला असल्याने चाकणे यांना महाग त्रासाला सामोरे जावे लागले आहे.
सदर गाडी छत्रपती संभाजीनगर परिसरात असून गाडीवर बसणारा व्यक्ती त्या परिसरातील असू शकतो व त्याला ओळखणारे अनेक जणही असू शकतात त्यामुळे शिरूर पोलिसांनी या गाडीचा शोध घेऊन आपली दृष्टी आता चोराकडे वळवावी अशी मागणी चाकणे यांनी केली
आहे.