शिरूर येथे कृषी सेवा केंद्रात कोयता व कात्रीने दहशत करून एकावर वार .... तिघा विरोधात गुन्हा दाखल

9 Star News
0

 शिरूर येथे कृषी सेवा केंद्रात कोयता व कात्रीने दहशत करून एकावर वार .... तिघा विरोधात गुन्हा दाखल


शिरूर प्रतिनिधी 

      शिरूर शहरातील विशाल कृषी सेवा केंद्रामध्ये कोयता व कात्री घेऊन तिघांनी आमच्या विरोधात तहसील कार्यालयात तक्रार करतो का ? असे म्हणून एकावर वार करून जखमी केले आहे याबाबत शिरूर पोलीस स्टेशन येथे तिघां विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

      याबाबत संतोष बाळू पाचर्णे (वय 42 वर्षे व्यवसाय मजुरी राहणार जांभळी मळा तरडोबाची वाडी ता. शिरूर जिल्हा पुणे) यांनी शिरूर पोलीस स्टेशन येथे फिर्याद दिली आहे.

        याप्रकरणी परवेश उर्फ पाप्या पठाण (पूर्ण नाव माहिती नाही), रुपेश चित्ते (पूर्ण नाव माहिती नाही), ओंकार दत्तात्रय जाधव (सर्व राहणार तरडोबाची वाडी ता. शिरूर जिल्हा पुणे )यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

              याबाबत शिरूर पोलिसांनी दिलेली माहिती पुढीलप्रमाणे फिर्यादीच्या फिर्यादीवरून दिनांक 5/4/ 2025 रोजी दुपारी दोन वाजण्याच्या सुमारास शिरूर शहरातील विशाल कृषी सेवा केंद्र या दुकानांमध्ये फिर्यादी तसेच मालक शिवम शिंदे काम करीत असताना परवेज उर्फ पाप्या, रुपेश चित्ते, ओंकार जाधव या सर्वांनी संगणमत करून ओंकार जाधव हा फिर्यादी यांना म्हणाला की "तुला लय मस्ती आली आहे काय आमची तक्रार तहसील ऑफिसला करतो काय तुला आता दाखवतोच थांब" असे म्हणून त्या तिघांनी फिर्यादी यांना शिवीगाळ दमदाटी करून पाप्या पठाण याने हाताने तसेच दुकानांमधील कात्रीने फिर्यादी यांच्या उजव्या हातावर व पायावर मारहाण करून जखमी केले तसेच रुपेश चित्ते याने त्याचे हातातील कोयता दुकानासमोर फिरवून आजूबाजूचे परिसरातील दुकानांमध्ये दहशत निर्माण केल्याने त्यांनी त्यांची दुकाने बंद केली. तसेच यावेळी दुकानासमोर रोडवर असणारे इतर व्यक्ती देखील पळून गेले त्यानंतर दुकानांमध्ये येऊन फिर्यादी यांचे डोक्यात पाठीमागील बाजूस वार करून फिर्यादी यांना जखमी केले फिर्यादी तसेच मालक शिवम शिंदे यांनी आरडाओरडा केल्याने तिघेजण दुकानाचे बाहेर पळून जाताना देखील रुपेश चित्ते हा त्याचे हातातील कोयता फिरवत दुकानाचे बाहेर निघून गेला आहे.

      याबाबत फिर्यादीवरून तिघांना गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास शिरूर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक संदेश केंजळे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक फौजदार साबळे करीत

 आहे.

Tags

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा (0)

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!