आमदार माऊली कटके यांचा फोन आणि चासकमानचे पाणी न्हावरे परिसरासाठी सुटले

9 Star News
0

 आमदार माऊली कटके यांचा फोन आणि चासकमानचे पाणी न्हावरे परिसरासाठी सुटले


शिरूर प्रतिनिधी 

चासकमान प्रकल्पातील उन्हाळी आवर्तनाचे सोडलेले पाणी नेहमीच्या नियोजनाप्रमाणे शिरूर तालुक्यातील न्हावरे परिसरासाठी न सोडता चासकमान प्रशासनाने ते पुढील भागात सोडले त्यामुळे न्हावरे परिसरातील संतप्त शेतकऱ्यांनी थेट आमदार ज्ञानेश्वर उर्फ माऊली कटके यांच्याकडे गाऱ्हाणे मांडून प्रशासनाबाबत आपला संताप व्यक्त केला. आणि माऊली कटके यांचा एक फोन आणि कालव्याला पाणी... परिसरात आमदार कटके यांच्या फोनची चर्चा...

       अखेर शेतकऱ्यांची मागणी व गरज लक्षात घेऊन आमदार कटके यांनी थेट कार्यकारी अभियंता श्रीकृष्ण गुंजाळ यांना आजपासूनच न्हावरे परिसरात कालव्याला पाणी सोडा अशा सुचना दिल्यानंतर एका फोन मध्येच अखेर पाणी सोडले त्यानंतर लाभधारक शेतकऱ्यांनी समाधान व्यक्त करीत आमदार ज्ञानेश्वर उर्फ माऊली कटके यांच्या फोनची आणि पाणी आल्याची चर्चा परिसरात सुरू झाली.

याबाबत अधिक माहिती अशी की चासकमानचे पाणी सुटल्यानंतर तालुक्याच्या पुर्व भागातील न्हावरे त्यानंतर निर्वी,कोळगाव डोळस,आंधळगाव,गुनाट,निमोणे आदी परिसरात फिरवले जाते मात्र चालू उन्हाळी आवर्तनात संबंधित अधिकाऱ्यांनी सदरील पाणी न्हावरे परिसराला वगळून पुढील गावांना सोडले यामुळे न्हावरे, आंधळगाव परिसरातील लाभधारक शेतकरी संतप्त झाला शेतकऱ्यांनी थेट आमदार माऊली (आबा)कटके यांना गाठले आपले गाऱ्हाणे मांडले व वस्तू स्थिती सांगितली शेतकऱ्यांच्या मागणीची खातरजमा केल्यानंतर आमदार कटके यांनी क्षणाचाही विलंब न लावता शेतकऱ्यांसमोरच संबंधित अधिकाऱ्यांना फोन लावला व आजपासून न्हावरे परिसरासाठी पाणी सोडा अशा सुचना दिल्या त्यानुसार सांयकाळी कालव्याला पाणी सुटले त्यामुळे शेतकऱ्यांनी समाधान व्यक्त केले शेतकऱ्यांच्या वतीने राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस राजेंद्र कोरेकर,भाजपाचे प्रदेश संघटक सुभाष कांडगे, दिनेशजी दरेकर, सरपंच कमलताई कोकडे, सागर खंडागळे, जयवंतराव कोकडे, बिरदेव शेंडगे,नानासाहेब कोरेकर, सुरेश कोरेकर,दिपक कोकडे, अरूण तांबे, सुनिल कदम,गोरख तांबे,इक्बाल शेख,राजेंद्र गायकवाड,किरण नवले यांनी चर्चेत सहभाग घेतला.

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा (0)

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!