करडे येथे १३एप्रिल पासून ज्ञानेश्वर पारायण सोहळा व अखंड हरिनाम सप्ताहाचे आयोजन..
करडे ता.शिरूर येथे श्री विठ्ठल रूख्मिनी मंदिरामध्ये रविवार दिनांक १३ एप्रिल ते २० एप्रिल दरम्यान ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळा व अखंड हरिनाम सप्ताहाचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती ग्रामस्थांच्या वतीने देण्यात आली आहे.
१३ एप्रिल रोजी सकाळी ८:०० वाजता कलशपुजन होऊन ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळा व अखंड हरीनाम सप्ताह सोहळा सुरू होणार आहे. हा सप्ताह ४६ सप्ताह असून, कै.ह.भ.प.भाऊसाहेबतात्या देशमुख, कै.ह.भ.प.रामचंद्र आण्णासाहेब जगदाळे,
कै.ह.भ.प.भाऊसाहेब गेणूजी रोडे, कै.ह.भ.प.आबासाहेब देशमुख,कै.ह.भ.प.भगवंत लंघे यांच्या प्रेरणेने सुरू झाला.
या सप्ताह काळात अखंड विना,दैनंदिन सकाळची काकडा आरती, ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण, गाथा भजन, सायंकाळी हरिपाठ, कीर्तन असा दिनक्रम आहे.भजन, किर्तनकार वारकरी यांसाठी रोजच्या रोज सकाळी नाष्टा,दुपारी व सायंकाळी महाप्रसादाची व्यवस्था ग्रामस्थांतर्फे केली आहे.
सात दिवस अखंड हरिनामाचा जयघोष होणार असल्याने परिसरात भक्तिमय वातावरण आहे. सप्ताहानिमित्त मंदिरात आकर्षक सजावट व विद्युत रोषणाई करण्यात आली आहे.
करडे लंघेवाडीचे ग्रामदैवत असलेल्या भैरवनाथ मंदिरासमोरील सभामंडप व मोकळ्या जागेत हे कार्येक्रम होणार आहेत.मोकळ्या जागेत भव्य असा मंडप व भजण किर्तन प्रवचण यासाठी उत्कृष्ठ अशी साऊंड सिस्टीम लावली आहे.
या काळात मंदिरात सकाळी ६ ते ६ अखंड विना, पहाटे ५ वाजता काकड आरती, संत तुकाराम गाथा भजन, ज्ञानेश्वरी पारायण होणार असून, दुपारी प्रवचन, सायंकाळी हरिपाठ आणि ९ ते ११ या वेळेत नामांकित किर्तनकारांचे किर्तन होणार आहे.
सप्ताहाच्या शेवटच्या दिवशी सकाळी १० ते १२ वा.काल्याचे किर्तन होईल व त्यानंतर समस्त ग्रामस्थ करडे,लंघेवाडी यांजतर्फे सर्व भाविक भक्तांना महाप्रसादाचे नियोजन असते व त्यानंतर अखंड हरिनाम सप्ताहाची सांगता होईल.