सणसवाडीत रुग्णवाहिका व दुचाकीचा भीषण अपघात रुग्णाचा नातेवाईक ठार तर सहा जखमी आणि चालक फरार

9 Star News
0

 सणसवाडीत रुग्णवाहिका व दुचाकीचा भीषण अपघात

रुग्णाचा नातेवाईक ठार तर सहा जखमी आणि चालक फरार 


शिरूर ( प्रतिनिधी ) 

         सणसवाडी ता. शिरुर येथील पुणे नगर महामार्गावरून शिरुर येथील एका हॉस्पिटल मधून पुणे येथे रुग्णाला घेऊन जाणाऱ्या रुग्णवाहिकेच्या चालकाचा गाडीवरील ताबा सुटून रुग्णवाहिका समोरील दुचाकीला धडकून झालेल्या भीषण अपघातात रुग्णाचा नातेवाईक ठार तर इतर सहाजण गंभीर जखमी झाले तर अपघातानंतर रुग्णवाहिका चालक फरार झाला असून याप्रकरणी रुग्णवाहिका चालकावर शिक्रापूर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


गंभीर अपघात होऊन रुग्णवाहिका दुचाकीला धडकल्याने रुग्णवाहिकेतील रुग्णासह दोघे नातेवाईक आणि अन्य तिघे गंभीर जखमी होऊन रुग्णाचा एक नातेवाईक जागीच ठार झाल्याची घटना घडली मात्र यानंतर चालक फरार झाला असून याबाबत शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे सौरभ संतोष महाजन या रुग्णवाहिका चालकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

            या अपघातात रुग्णाचा नातेवाईक सुमित बळीराम चव्हाण (वय २८ वर्षे रा. रांजणगाव गणपती ता. शिरुर जि. पुणे)हा जागीच ठार झाला आहे तर गोविंद श्रीरंग पोळ, सुरज गणेश जगदाळे, ऋषिकेश गणेश जाधव (तिघे रा. सणसवाडी ता. शिरुर जि. पुणे), रुग्णवाहिकेतील रुग्ण रमेश काशिनाथ राठोड, विकी रमेश राठोड व उषा रमेश राठोड (सर्व रा. रांजणगाव गणपती ता. शिरुर जि. पुणे) हे गंभीर जखमी झाले आहेत.

                याबाबत जगन्नाथ बबनराव खोपकर वय ६१ वर्षे रा. सोलापूर रोड फातिमानगर पुणे यांनी शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे फिर्याद दिली आहे.

       याप्रकरणी रुग्णवाहिका चालक सौरभ संतोष महाजन ( रा. शिरुर ता. शिरुर जि. पुणे) याच्या विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

     याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती पुढील प्रमाणे सणसवाडी ता. शिरुर येथील पुणे नगर महामार्गावरून एम एच १२ डब्ल्यू जे १७९५ हि रुग्णवाहिका शिरुर येथील एका हॉस्पिटल मधील रमेश काशिनाथ राठोड या रुग्णाला घेऊन रुग्णवाहिका चालक सौरभ महाजन हा भरधाव वेगाने पुण्याच्या दिशेने चाललेली असताना सणसवाडी जवळ मजाक कंपनी समोर भरधाव आलेल्या रुग्णवाहिका चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटून रुग्णवाहिका समोरील एम एच १२ १४ एम ५२८५ या दुचाकिला जोरात धडक देऊन झालेल्या अपघात रुग्णाचा नातेवाईक सुमित चव्हाण जागीच ठार झाला तर दुचाकीवरील गोविंद पोळ व सुरज जगदाळे दोघांसह रस्त्या जवळील ऋषिकेश जाधव हे गंभीर जखमी झाले तर रुग्णवाहिकेतील रुग्ण रमेश राठोड तसेच रुग्णाचे नातेवाईक विकी राठोड व उषा राठोड हे गंभीर जखमी झाले अपघातानंतर रुग्णवाहिका चालक फरार झाला आहे.

         या अपघातात रुग्णवाहिका दुचाकीला धडकल्यानंतर अपघाताची तीव्रता इतकी भयानक होती कि दुचाकी रुग्णवाहिकेत अडकून बसली आणि रुग्णवाहिकेतील पुढील इसम थेट जमिनीवर पडला तसेच रुग्णवाहिकेतील असलेल्या एअर बेग देखील पूर्णपणे उघडल्या गेल्या मात्र रुग्णवाहिकेतील एकाचा जीव गेल्याने जीवदान देणाऱ्या रुग्णवाहिकेच्या अपघातात एकाचा जीव गेला अशी अपघाताची तीव्रता मोठी होती. फिर्यादीवरून शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे अपघाताचा गुन्हा दाखल केला

असून पुढील तपास पोलीस निरीक्षक दिपरतन गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार रविकिरण जाधव हे

 करत आहे.

Tags

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा (0)

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!