घोडधरण मुळ लाभार्थी बचाव समिती आक्रमक.. जीवगेला तरी बेहत्तर साकळाई उपसा जलसिंचन योजना होऊ देणार नाही. शेतकऱ्यांचा यलगार...

9 Star News
0

 घोडधरण मुळ लाभार्थी बचाव समिती आक्रमक.. जीवगेला तरी बेहत्तर साकळाई उपसा जलसिंचन 

योजना होऊ देणार नाही. शेतकऱ्यांचा यलगार...

 


शिरूर प्रतिनिधी 

       साकळाई उपसा जलसिंचन योजनेला विरोध करण्यासाठी शिरूर तालुक्यातील व श्रीगोंदा तालुक्यातील शेतकरी वर्ग शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या पक्षाबरोबर उभा ठाकला असून यासाठी घोडधरण मूळ लाभार्थी बचाव कृती समितीची स्थापना करण्यात आली असून जीवाची बाजीलावू परंतु ही योजना रद्द करू असा यलगार मूळ लाभार्थी शेतकऱ्यांनी केला आहे.

          घोड धरणातून होणाऱ्या या साकळाई उपसा जलसिंचन योजना शिरूर तालुक्यातील व श्रीगोंदा तालुक्यातील शेतकऱ्यांच्या मुळावर आली असून यामुळे मोठा फटका शेतीच्या पाण्याला बसणार आहे. त्यामुळे १ एप्रिल २०२५ रोजी शिरुर तहसीलदार श्बाळासाहेब म्हस्के यांना शिवसैनिक अनिल पवार,योगेश ओव्हाळ पाटील,संतोषराव काळे व ईतर शेतकरी यांनी साकळाई उपसा जलसिंचन योजनेला विरोध संदर्भात निवेदन दिले व सर्वप्रथम विरोध सुरू करून याबाबतचे तोटे याभागातील घोडधरण मूळ लाभार्थी यांना समजल्याने या योजनेला विरोध सुरू झाला आणि दि.१०/४/२०२५ रोजी चिंचणी येथे शेतकरी सार्वजनिक बैठक पार पडली,या शेतकरी बैठकीमध्ये साकळाई योजनेचा कडाडून विरोध करण्यात आला आहे.

         घोडधरणावर अवलंबून असणार्‍या शेतकर्‍यांच्या न्याय हक्कासाठी वेळप्रसंगी जेलभरो,रास्ता रोको आंदोलन व कायदेशीर प्रक्रीया करण्याचे ठरले आहे,सरकारने घोडधरण मुळ लाभार्थी व लाभधारक व रांजणगाव,करडे,कारेगाव एम,आय,डी,सी,पिण्याचे पाणीपुरवठा योजना यांना न जुमानता अन्यायकारक साकळाई उपसा जलसिंचन योजना लादण्याचा प्रयन्त केला आहे.

       या योजनेला विरोध करण्यासाठी शिरुर व श्रीगोंदा तालुक्यातील शेतकरी मोठ्या संख्येने यावेळी उपस्थित होते.

         यावेळी शेतकरी संघटनेचे प्रदेश उपाध्यक्ष बाळासाहेब घाडगे, शिवसेनेचे अनिल पवार योगेश ओव्हाळ,नरेंद्र माने,एकनाथ आबा वाळुंज, शुभम नवले,संजय आबा काळे,संदिप नवले,श्रीनिवास घाडगे,राकेश पाचपुते,विठ्ठलराव काकडे,शामराव पवार,दादासो पवार,राजेंद्र पवार,कैलास पवार,सुनील गायकवाड,शहाजी गायकवाड,प्रकाश पवार,सुमन वाळुंज,अनिल सुभेदार पवार,राम जेऊघाले, नामदेव पवार,बाळासाहेब पवार, अशोक पवार,संतोष लगड,भाऊसाहेब चौधरी,बाबासाहेब चौधरी,माऊली नागावडे,दौलत पवार तसेच घोडधरणाचे अनेक लाभार्थी शेतकरी उपस्थित होते.

Tags

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा (0)

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!