शिरूर बसस्थानका विरोधात सुरू असलेले सामाजिक कार्यकर्ते प्रितेश फुलडाळे यांचे उपोषण लेखी आश्वासनानंतर मागे... आंदोलनाला यश

9 Star News
0

शिरूर बसस्थानका विरोधात सुरू असलेले सामाजिक कार्यकर्ते प्रितेश फुलडाळे यांचे उपोषण लेखी आश्वासनानंतर मागे... आंदोलनाला यश 

 


शिरूर प्रतिनिधी 

          शिरूर एसटी बसस्थानकात नवीन एसटी बस मिळाव्या,महिला शौचालय मोफत व्हावे बसस्थानकात पाण्याची व्यवस्था व्हावी यास विविध १२  मागण्यासाठी शिरूर येथील सामाजिक कार्यकर्ते प्रितेश फुलडाळे यांनी सुरू केलेले उपोषण एसटी महामंडळाने दहा दिवसाच्या मागण्याची पूर्तता करणार असल्याचे लेखी पत्र दिल्याने उपोषण मागे घेण्यात आले आहे.
         शिरूर बस स्थानकात सुरू केलेल्या या उपोषणात पुणे येथील एसटी महामंडळाचे विभागीय वाहतूक अधिकारी कमलेश धनराळे व शिरूर एसटी बसस्थानकाचे आगार व्यवस्थापक मनीषा गायकवाड, भैरवनाथ दळवी,शिरूर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक संदेश केंजळे आंदोलन करते यांची चर्चा झाली या चर्चेनंतर शिरूर आगार व्यवस्थापक मनीषा गायकवाड यांनी उपोषण करते प्रितेश फुलडाळे व सर्वपक्षीय प्रिया बिरादार 
 कोमल भगवे, सृष्टी करंजुले , शिवसेना शहर प्रमुख सुजाता  पाटील,संदीप कडेकर, वैशाली साखरे, राजेंद्र महाजन,सागर नरवडे, शरद परदेशी, शरद कालेवार,सुनील जाधव, सावळीराम आवारे संतोष शिंदे बाबुराव पाचंगे अविनाश घोगरे, राजेंद्र क्षीरसागर ,विजू नरके आकाश चाकणे, यांचे म्हणणे ऐकून त्यांच्या मागण्या मान्य केल्याच्या पत्र दिले आहे. व यामगण्या दहा
दिवसाच्या आत पूर्ण करण्यात येतील असे सांगण्यात आले.
रा.प. शिरूर बसस्थानकावर प्रवाशांकरिता पिण्याच्या पाण्याची सोयीकरिता १० रांजणठेवून पाण्याची सोय करण्यात येईल व पाणपोईसाठी नविन जागेबाबत लवकर मार्ग काढणार .
      बसस्थानकामध्ये प्रवेशव्दाराजवळील रस्ता अरुद आहे तसेच तेथेच निकसक यांनी बांधकाम साहित्य टाकले आहे ते इतरत्र हलवून रस्ता वाहतुकीस अडथळा होणार नाही याची दक्षता घेऊन डांबरीकरण करण्यात येईल.
     शिरुर आगारास नवीन १० बसेस मिळणेबाबत प्रस्ताव सादर केलेला असून १० बसेस पुढील महिन्याभरात प्राप्त होतील.
      महिला स्वच्छतागृहामध्ये खास महिलांसाठी मोफत असा स्वतंत्र व मोठा फलक लावण्यात येईल. तसेच महिला स्वच्छतागृहामध्ये नियमित महिला कर्मचारी नेमणेबाबत सूचना देण्यात येतील तसेच नियमित स्वच्छता राखणे बाबत आगारपातळीवर कार्यवाही केली जाईल.
      बाहयवळण मार्गाने जाणा-या बसेसशिरुर आगारात येवून प्रवासी चढ-उतार करणेबाबत चालक-वाहकांना सूचना देण्यात येतील.
      बसस्थानकावर दोन पाळीमध्ये सुरक्षिततेच्या दृष्टीने पोलीस कर्मचारी नेमणेबाबत पोलीस निरिक्षक यांचेकडे मागणी करून नियुक्त केले जातील.
      बसस्थानकाच्या प्रवेशव्दाराजवळ नादुरुस्त बसेस उभ्या केल्या जाणार नाहीत.
      ग्रामीण व शहरी भागात जाणा-या बसेस ज्या-त्या फलाटावरच लागतील याबाबत दर्शनी भागात सूचना लावण्यात येईल.
    रा.प. कर्मचारी आराम कक्षाची पहाणी करुन नियोजन केले जाईल.
       नियमित स्वच्छताराखणेबाबतनिकसक यांना सूचना देवून नगरपालिकेस दैनंदिन संकलित कचरा नेणेबाबत कळविण्यात येईल व कार्यवाही करण्यात येईल.
       नाथजल पाणी बाटली रु. १५ रुपये बसस्थानकावर २० स्टिकर्स दर्शनी भागात लावण्यात येतील.
       बसस्थानकावरील पखे चालु ठेवले जातील तसेच पुरेशी प्रकाश व्यवस्था ठेवली जाईल. पेट्रोल पंप इतरत्र हलवण्यासाठी प्रयत्न करणार या सर्व मागण्या दहा दिवसाच्या पूर्ण करणार असल्याची त्यांनी या पत्रात म्हटले आहे या  लेखी आश्वासनानंतर उपोषण मागे घेण्यात आले.



       


Tags

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा (0)

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!