तडीपार आदेशाचा भंग; शिरूर पोलिसांकडून आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल
शिरूर , प्रतिनिधी
तडीपार असणाऱ्या गुन्हेगाराला स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा पथकाने तडीपार आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी पकडले असून, शिरूर पोलीस ठाण्यात सराईत गुन्हेगारावर तडीपार कायद्याचा भंग केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत पुणे ग्रामीण स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस हवालदार जनार्दन सुरेश शेळके यांनी फिर्याद दाखल केली आहे.
गणेश उर्फ श्रीरंग शंकर महाजन (वय ३६, रा. गोलेगाव, ता. शिरूर, जि. पुणे) याच्याविरुद्ध मुंबई पोलीस अधिनियम कलम १४२ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती पुढीलप्रमाणे दिनांक २५ एप्रिल २०२५ रोजी सायंकाळी साडेसहा वाजण्याच्या सुमारास बाबुरावनगर, शिरूर येथे गस्त घालत असताना पोलीस हवालदार पचारे, पोलीस हवालदार संजू जाधव व फिर्यादी जनार्दन शेळके यांना गोपनीय बातमीदारामार्फत माहिती मिळाली की तडीपार गुन्हेगार गणेश महाजन ताडीपार असताना तो पुन्हा शिरूर बाबुरावनगर भागात तडीपार नियमांचे भंग करून फिरत आहे . गोपनीय माहितीचे आधारे पोलीस पथकाने बाबुराव नगर परिसरात आरोपीचा शोध घेत असताना आरोपी गणेश महाजन शिरूर गावच्या हद्दीत बाबुराव नगर येथील ज्ञानगंगा शाळेच्या मागे फिरताना आढळून आला. पोलिसांनी त्याला पकडून ताब्यात घेतली व शिरूर पोलिसांच्या ताब्यात दिले आहे.
गणेश महाजन याच्यावर पोलीस अधीक्षक, पुणे ग्रामीण यांनी २ वर्षांसाठी पुणे जिल्ह्यासह (पुणे शहर, पिंपरी-चिंचवड आयुक्तालय क्षेत्रासह) तसेच अहमदनगर जिल्ह्यातील पारनेर व श्रीगोंदा तालुक्यातून हद्दपार आदेश काढलेला असतानाही, तो
कोणतीही पूर्वपरवानगी न घेता हद्दपार असलेल्या भागात वास्तव्यात असल्यास मिळून आला असल्याने त्याने हद्दपार आदेशाचे उल्लंघन केल्याचे निष्पन्न झाले.
त्याच्याविरुद्ध शिरूर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला आहे.
या प्रकरणाचा तपास शिरूर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक संदेश केंजळे यांच्या मार्गदर्शनाखाली
पोलीस हवालदार नाथसाहेब जगताप करीत आहेत.