लोणी काळभोर व कदम-वाकवस्ती येथे ‘मन की बात’ कार्यक्रम उत्साहात संपन्न
शिरूर प्रतिनिधी (लोणी काळभोर )
आज लोणी काळभोर व कदम-वाकवस्ती येथे भारतीय जनता पार्टीच्या वतीने देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या १२१ व्या ‘मन की बात’ कार्यक्रमाचे थेट प्रक्षेपण आयोजित करण्यात आले. नागरिकांनी मोठ्या संख्येने या कार्यक्रमाला प्रतिसाद दिला.
या कार्यक्रमाच्या निमित्ताने विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या व्यक्तींचा सत्कार करण्यात आला. भारतीय जनता पार्टीच्या सोलापूर रोडमंडल अध्यक्षपदी गणेश चौधरी व नगर रोड मंडल अध्यक्षपदी विजय जाचक यांची निवड झाल्याबद्दल विशेष सत्कार करण्यात आला.
स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेच्या इंग्लिश मीडियम स्कूलने तालुक्यात दुसरा क्रमांक पटकावल्याबद्दल मुख्याध्यापिका पोर्णिमा शेवाळे यांचा गौरव करण्यात आला.
तसेच, कन्या प्रशाला लोणी काळभोरने तालुक्यात तिसरा क्रमांक मिळविल्याबद्दल प्रशालेच्या शिक्षकवृंदाचा सत्कार करण्यात आला. नुकत्याच पार पडलेल्या शिष्यवृत्ती परीक्षेत यश मिळविलेल्या विद्यार्थ्यांचाही सन्मान करण्यात आला.
या कार्यक्रमाला पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक प्रदीपदादा कंद, जिल्हा नियोजन समिती सदस्य प्रवीण काळभोर,सोलापूर रोड मंडल अध्यक्ष गणेश चौधरी, नगर रोड मंडल अध्यक्ष विजय जाचक, लोणी काळभोर शहराध्यक्ष कमलेश काळभोर, मुख्याध्यापिका पोर्णिमा शेवाळे, तसेच अशोकराव कदम, श्री. राजेंद्र हाजगुडे, विशाल वेदपाठक, राम भंडारी, विजय रणदिवे, सूर्यकांत काळभोर आदी मान्यवर, विद्यार्थी व शिक्षक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाचे संयोजन अत्यंत प्रेरणादायी झाले असून उपस्थितांनी ‘मन की बात’ कार्यक्रमातून देशविकासाच्या दिशेने योगदान देण्याचा निर्धार व्यक्त केला
.