मांडवगण फराटा विविध कार्यकारी सोसायटी निवडणुकीत श्री वाघेश्वर सहकार विकास आघाडीचा एकतर्फी विजय

9 Star News
0


मांडवगण फराटा विविध कार्यकारी सोसायटी निवडणुकीत श्री वाघेश्वर सहकार विकास आघाडीचा एकतर्फी विजय


शिरूर प्रतिनिधी :

शिरूर तालुक्याचे लक्ष लागलेल्या मांडवगण फराटा (ता. शिरूर) येथील विविध कार्यकारी सहकारी सोसायटीच्या निवडणुकीत श्री वाघेश्वर सहकार विकास आघाडीने एकतर्फी विजय मिळवत सर्व १३ जागांवर वर्चस्व प्रस्थापित केले आहे. या विजयात शिवशक्ती सहकार पॅनलचा दणदणीत पराभव झाला.

सात दिवसांपासून जोरदार प्रचाराच्या पार्श्वभूमीवर, शनिवारी (दि. २६ एप्रिल) निवडणुकीसाठी मतदान पार पडले. सकाळी ९ ते सायंकाळी ५ या वेळेत मतदारांनी उत्स्फूर्तपणे मतदानाचा हक्क बजावला. २७०३ मतदारांपैकी २२६५ मतदारांनी मतदानात सहभाग घेतला. या दरम्यान दोन्ही पॅनलचे उमेदवार आणि कार्यकर्ते मतदान केंद्राबाहेर सक्रीयपणे राबत होते.

सायंकाळी पाच वाजता मतदान संपल्यानंतर सात वाजल्यापासून मतमोजणीला सुरुवात झाली. सुरुवातीपासूनच श्री वाघेश्वर सहकार विकास आघाडीने आघाडी घेतली होती आणि अखेर सर्व जागांवर मोठ्या मताधिक्याने विजय संपादन केला. निकाल जाहीर होताच कार्यकर्त्यांनी गुलाल उधळून, फटाके फोडून व जल्लोषात आनंद साजरा केला.

या विजयात श्री वाघेश्वर सहकार विकास पॅनलचे नेतृत्व मदन दादा फराटे यांनी तर शिवशक्ती सहकार पॅनलचे नेतृत्व दादा पाटील फराटे यांनी केले होते.

विजयी उमेदवार पुढीलप्रमाणे :

  • सर्वसाधारण प्रतिनिधी :

    • शरद पोपटराव चकोर
    • प्रवीण राजेंद्र जगताप
    • खंडेराव विठ्ठल फराटे पाटील
    • गोविंद नामदेव फराटे
    • पंडितराव निवृत्ती फराटे
    • महादेव किसनराव फराटे
    • संपत नामदेव फराटे
    • राजेंद्र रावसो बोत्रे
  • अनुसूचित जमाती प्रतिनिधी :

    • बिभीषण अशोक थोरात
  • महिला प्रतिनिधी :

    • रूपाली गणेश फराटे
    • सीमा दत्तात्रय फराटे
  • इतर मागासवर्गीय प्रतिनिधी :

    • उमाकांत बाबा कुंभार
    • शहाजी कारभारी कोळपे

मतमोजणी व निवडणूक प्रक्रिया
मतमोजणीसाठी सहायक निबंधक तथा निवडणूक निर्णय अधिकारी अरुण साकोरे यांच्या मार्गदर्शनाखाली दीपक वराळ, प्रशांत पिसाळ, आप्पा धायगुडे, पोपट हराळ आणि सोसायटीचे अधिकारी व कर्मचारी यांनी परिश्रम घेतले. निवडणूक शांततेत पार पाडण्यासाठी मांडवगण फराटा पोलीस चौकीचे अधिकारी व कर्मचारी दिवसभर कडक बंदोबस्तात तैनात होते.


टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा (0)

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!