शिरूर श्रीराम मंदिर व श्री शिवसेवा मंडळाचे वतीने मोठ्या उत्साहात राम जन्मोत्सव साजरा करण्यात आला
शिरुर दिनांक ( प्रतिनिधी ) 'सियावर रामचंद्र की जय' , 'जय श्रीराम' च्या जयघोषात शिरुर शहरात श्रीराम जन्मोत्सव (श्रीरामनवमी) मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली .
शहरातील राम आळीतील समस्त नामदेव शिंपी समाज श्रीराम मंदिरात नामदेव शिंपी समाज व श्री शिवसेवा मंडळ ट्रस्ट यांचा वतीने रामजन्मसोहळा कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते .
यावेळी श्रीरामच्या जयघोष करण्यात आला . नेवासा येथील ह. भ .प सदाशिव महाराज तोगे यांचे श्रीरामजन्मावर किर्तन झाले.श्रीराम जन्माचा पाळणा म्हणण्यात आल्या नंतर सुंठवडा प्रसादाचे वाटप करण्यात आले
तर श्री शिवसेवा मंडळ ट्रस्ट येथे ह.भ.प. संदीप महाराज लोहकरे आळंदी यांचे कीर्तन झाले तर महाप्रसाद विश्वस्त श्रीनिवास परदेशी यांच्या वतीने देण्यात आला.
श्रीराम नवमी निमित्त राममंदिर परिसरात रोषणाई करण्यात आली होती. विश्व हिंदू परिषद बजरंग दल शिरुर प्रखंड यांच्यावतीने महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते . यावेळी माजी नगराध्यक्ष राजेंद्र क्षीरसागर ,समस्त नामदेव शिंपी समाजचे विवेक बगाडे ,सिध्देश्वर बगाडे ,राजू बोत्रे , नाना पाटेकर , तर शिवसेवा मंडळाचे सचिव मनसुख गुगळे, विश्वस्त ॲड सुभाष पवार, डॉ. योगेश उपलेंचवार ,माऊली घावटे, श्रीनिवास परदेशी, सुरेश खांडरे, प्रकाश धााडीवाल,यांच्यासह मोठ्या संख्येने भाविक उपस्थित होते . शहरातील शिवसेवा मंदिर , शनि मंदिर व रामलिंग मंदिर याठिकाणीही श्रीराम नवमीच्या कार्यक्रम पार पडला .
शिरूर शहरात बजरंग दलांच्या वतीने भव्य मिरवणूक काढण्यात आली
होती.