पिंपळे जगताप मध्ये कंपनी सुपरवायझरला हुकने मारहाण

9 Star News
0

 पिंपळे जगताप मध्ये कंपनी सुपरवायझरला हुकने मारहाण


शिरूर 

( प्रतिनिधी ) पिंपळे जगताप ता. शिरुर एस एम आर कंपनीमध्ये अशोक कोरडे याचे कंपनीतील एका कामगारासोबत वाद झाले त्यानंतर कंपनीचे सुपरवायझर अनिल उदमले हे कंपनीच्या गेटवर आलेले असताना अशोक याने तुम्ही कंपनीत माझी बाजू का घेतली नाही असे म्हणून शिवीगाळ, दमदाटी करत लोखंडी हुकने पोटावर मारून जखमी केले, याबाबत अनिल एकनाथ उदमले वय ४२ वर्षे रा. करंदी फाटा करंदी ता. शिरुर जि. पुणे मूळ रा. बाभुर्डी ता. श्रीगोंदा जि. अहिल्यानगर यांनी शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे फिर्याद दिल्याने पोलिसांनी अशोक गणेशराव कोरडे रा. नप्ते वस्ती करंदी ता. शिरुर जि. पुणे मूळ रा. फुले पिंपळगाव ता. माजलगाव जि. बीड याच्या विरुद्ध गुन्हा दाखल केला असून पुढील तपास पोलीस हवालदार नरेंद्र गायकवाड हे करत आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा (0)

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!