भ्रष्टाचार प्रतिबंधक विभाग, पुणे यांची कारवाई: भांबर्डे ग्रामपंचायत महिला अधिकारी लाच घेताना रंगेहाथ पकडले
पुणे (२८ एप्रिल २०२५) –
अॅन्टी करप्शन ब्युरो (ACB) पुणे पथकाने ग्रामपंचायत भांबर्डे (ता. शिरूर, जि. पुणे) येथील ग्रामपंचायत अधिकारी श्रीमती निर्मला कैलास भुजबळ (वय ४४ वर्षे) यांच्यावर लाच मागणी व लाच स्वीकारताना रंगेहात पकडले आहे.
तक्रारदार (वय ३७ वर्षे) यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, सन २०२०-२१ मध्ये भांबर्डे ग्रामपंचायतीच्या हद्दीत पेवर ब्लॉक बसविण्याचे व अंगणवाडीचे बांधकाम केले होते. या कामांच्या बिलासाठी उर्वरित रक्कमेचा चेक मिळवून देण्यासाठी ग्रामपंचायत अधिकारी निर्मला भुजबळ यांनी बिलाच्या सहा टक्के म्हणजेच ₹६० हजार रुपयांची लाचेची मागणी केली होती. ही तक्रार २७ मार्च २०२५ रोजी दाखल करण्यात आली होती.
त्यानंतर दि. १/०४/२०२५, ३/०४/२०२५ व १५/०४/२०२५ रोजी पडताळणी करताना, आरोपीने लाचेची मागणी केली असल्याचे निष्पन्न झाले.
आज, दि. २८ एप्रिल २५ रोजी सापळा रचून भांबर्डे ग्रामपंचायत कार्यालयात तक्रारदाराकडून ६० हजार रुपये (दहा हजार रुपये पेवर ब्लॉकच्या बिलासाठी आणि पन्नास हजार रुपये अंगणवाडीच्या बिलासाठी) स्वीकारताना श्रीमती भुजबळ यांना पंचासमक्ष रंगेहाथ पकडण्यात आले.
सदर प्रकरणी रांजणगांव एमआयडीसी पोलीस स्टेशन, पुणे ग्रामीण येथे भ्रष्टाचार प्रतिबंध अधिनियम १९८८ चे कलम ७ अन्वये गुन्हा नोंदविण्याची प्रक्रिया सुरू आहे.
ही कारवाई पोलीस उप आयुक्त/पोलीस अधीक्षक श्री. शिरीष सरदेशपांडे व अपर पोलीस अधीक्षक डॉ. शीतल जानवे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक श्री. विरनाथ माने व त्यांच्या पथकाने पार पाडली.
सार्वजनिक आवाहन: जर कोणतेही शासकीय अधिकारी/कर्मचारी किंवा त्यांच्या वतीने एखादा खाजगी व्यक्ती शासकीय कामासाठी कायदेशीर फी व्यतिरिक्त लाचेची मागणी करीत असेल, तर नागरिकांनी तत्काळ खालील माध्यमांद्वारे लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, पुणे यांच्याशी सं
पर्क साधावा: