शिकापूर येथील रिलायंन्स जिओ कंपनीच्या गोडाऊनमध्ये चोरी करणारे ६ परप्रांतीय चोरटे अटक शिकापुर पोलीस स्टेशनच्या गुन्हे शोध पथकाची कामगिरी

9 Star News
0

 शिकापूर येथील रिलायंन्स जिओ कंपनीच्या गोडाऊनमध्ये चोरी करणारे ६ परप्रांतीय चोरटे अटक शिकापुर पोलीस स्टेशनच्या गुन्हे शोध पथकाची कामगिरी


शिरूर दिनांक प्रतिनिधी 

          शिक्रापूर ता शिरूर येथील रिलायन्स जिओ कंपनीच्या गोडाऊनमध्ये चोरी करून लाखोचा ऐवज चोरणारे सहा परप्रांतीय चोरट्यांना शिक्रापूर पोलीस स्टेशनच्या तपास पथकाने अटक केली असून त्यांच्याकडून नऊ लाखाचा ऐवज जप्त करण्यात आला असल्याची माहिती शिक्रापूर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक दीपरतन गायकवाड यांनी सांगितले.

          आलम युनुस मनीयार (वय ३४ वर्षे, रा. गायकवाडनगर, पुनवळे ता. हवेली जि. पुणे)अनिल लखीराम गुप्ता0( वय ३९ वर्षे, सध्या रा.लक्ष्मीमाता मंदिर, भारतनगर, कत्तारवाडी, येरवडा, पुणे), विरेंदर धरमसिंग जाटाव (वय २७ वर्षे, रा. गायकवाडनगर, पुनवळे, ता. हवेली, जि.पुणे, मुळ रा. गडीवाधवा, ता. हिंडोनसीटी, जि. करोली, राज्य राजस्थान),विशाल पप्पू कश्यप( वय १९ वर्षे, सध्या रा. मुंजाबावस्ती, विमान बिल्डींग शेजारी, श्रीहंसनगर धानोरी पुणे. मुळ रा.मुलीयामऊ, कायतंगापुर्वा, ता.जि. रायबरेली, राज्य उत्तरप्रदेश), शिवम बजरंगी कश्यप( वय २२ वर्षे, सध्या रा. सध्या रा. मुंजाबावस्ती, विमान बिल्डींग शेजारी, श्रीहंसनगर, धानोरी, पुणे. मुळ रा.मुलीयामऊ, कायतंगापुर्वा, ता. जि. रायबरेली, राज्य उत्तरप्रदेश), शामजी चिकनू यादव (वय २४ वर्षे, सध्या रा. गायकवाडनगर, पुनवळे, ता. हवेली, जि.पुणे. मुळ रा. तिरलोकपुर, ता.इटवा, जि. सिध्दार्थनगर, राज्य उत्तरप्रदेश) या साधनांना पोलिसांनी अटक केली आहे. 

       नितीन गोपाळा भोर (वय ४० वर्षे , रा. ऑक्सी डिझायर सोसायटी, गाडेवस्ती, वाघोली, ता. हवेली, जि. पुणे )यांनी फिर्याद दिली होती. 

       याबाबत शिक्रापूर पोलिसांनी दिलेली माहिती पुढील प्रमाणे ४ एप्रिल रोजी रात्रीच्या सुमारास अज्ञात चोरट्यांनी जिओ कंपनीचे गोडाऊनच्या भिंतीला भोक पाडून गोडाऊन मध्ये प्रवेश करून मेटल कॉपर केबल,

५ केबल कनेक्टर, दहा बॅटऱ्या असा एकूण ५ लाख ५९ हजाराचा ऐवज चोरी केला होता याबाबत शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे फिर्याद दाखल झाल्याने 

अशाप्रकारे औद्योगिक क्षेत्रात चोरी झाल्याने या गुन्ह्याचा तपास करण्याच्या सूचना पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षक पंकज देशमुख यांनी शिक्रापूर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक दिपरतन गायकवाड यांना दिल्या होत्या.अशा प्रकारे औद्योगीक भागात चोरी करणाऱ्या आरोपींचा लवकरात लवकर शोध घेणे बाबत गुन्हे शोध पथकाला सुचना दिलेल्या होत्या.त्याप्रमाणे शिकापुर पोलीस स्टेशनचे गुन्हे शोध पथकातील पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी शिक्रापूर, जातेगाव, सणसवाडी, कोरेगाव भिमा, लोणीकंद, वाघोली व पुढे शहर परीसरामध्ये गुन्हयाचा तांत्रीक पध्दतीने तपास केला असता, सदरचा गुन्हा करण्यासाठी आरोपींनी एक लाल रंगाची युनिकॉर्न गाडी व एक टेम्पो वापरला असल्याची माहीती मिळाली. त्याप्रमाणे पोलीसांनी आरोपींची माहीती काढुन गुन्हयाचे तपासामध्ये वरील सहा आरोपींना मोठ्या शिताफिने अटक करून त्यांना चौकशी केली असता सहाही आरोपींनी ही चोरी केल्याची कबूल करून चोरीचा दहा बॅटऱ्या किंमत ३ लाख , एक टेंपो , एक मोटर सायकल असा नऊ लाखाचा ऐवज जप्त करण्यात आला आहे.सदरची कामगिरी पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षक पंकज देशमुख, पुणे विभाग अप्पर पोलीस अधीक्षक रमेश चोपडे, शिरूर उपविभागीय पोलीस अधिकारी प्रशांत ढोले, रांजणगाव पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक दिपरतन गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली शिक्रापूर पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक महेश डोंगरे, ग्रेड पोलीस उपनिरीक्षक जितेंद्र पानसरे, पोलीस हवालदार श्रीमंत होनमाने, अमोल दांडगे, विकास पाटील रोहिदास पारखे शिवाजी चितारे जयराज देवकर अमोल नलगे या पथकाने केली आहे.





Tags

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा (0)

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!