श्री रामलिंग मंदिर दोन मे ते 9 मे दरम्यान बंद... श्री रामलिंग पिंडीस वज्रलेपाचे काम होणार - पोपट दसगुडे
शिरुर प्रतिनिधी
शिरुर शहर व पंचक्रोशीचे आराध्य दैवत असलेले प्रभु श्री रामलिंग महाराज पिंडीला वज्रलेप लावण्यात येणार असल्याने श्री रामलिंग मंदीर दिनांक २ मे ते ९ मे पर्यंत बंद राहणार असल्याची माहीती रामलिंग देवस्थानचे खजिनदार पोपटराव दसगुडे यांनी दिली .
यावेळी देवस्थानचे सहसचिव तुळशीराम परदेशी , विश्वस्त गोधाजी घावटे , रावसाहेब घावटे ,वाल्मिकराव कुरुंदळे ,बलदेवसिंग परदेशी ,नामदेव घावटे ,सल्लागार जगन्नाथ पाचर्णे ,बबनराव कर्डिले
आदी उपस्थित होते .
श्री रामलिंग मंदिर येथील पिंडीला कुठली इजा होऊ नये यासाठी मंदिर देवस्थान ट्रस्टचे वतीने सुरक्षेच्यासाठी पिंडीला वज्रलेप लावण्यात येणार आहे. दोन मे ते नऊ मे दरम्यान हे काम होणार असून या काळात मंदिर बंद राहणार आहे असे दसगुडे यांनी सांगितले .
रामलिंग देवस्थानचे अध्यक्ष व प्रसिध्द उद्योगपती प्रकाशभाऊ धारीवाल यांनी सांगितले कि रामलिंग महाराज यांच्या पिंडीला वज्रलेपाचे काम होणार असुन त्यासाठी मंदीर त्या काळात बंद राहणार असुन या काळात भाविकांनी सहकार्य करण्याचे आवाहन धारीवाल यांनी केले
आहे .