शिरूर नगरपरिषद शाळा क्रमांक उतरली खाजगी शाळेंच्या स्पर्धेत... मोफत शिक्षण देणाऱ्या शाळेत पालकांनी आपल्या मुलांना प्रवेश घ्यावा केले आव्हान

9 Star News
0

 शिरूर नगरपरिषद शाळा क्रमांक एक उतरली खाजगी शाळेंच्या स्पर्धेत... मोफत शिक्षण देणाऱ्या शाळेत पालकांनी आपल्या मुलांना प्रवेश घ्यावा केले आव्हान


शिरूर दिनांक प्रतिनिधी 

         शिरूर नगरपरिषद प्राथमिक शाळा क्रमांक एक यांनी शिरूर शहरातील व परिसरातील विद्यार्थ्यांनी या शाळेमध्ये प्रवेश घ्यावा यासाठी उत्कृष्ट शिक्षण व सीबीएससी पॅटर्न अंतर्गत शिक्षण देणार असलेले जाहिरात सुरू केली असून या शाळेच्या शिक्षकांनी मोफत शिक्षण व चांगले शिक्षण देण्यासाठी कंबर कसली आहे. त्यामुळे शिरूर शहरातील व परिसरातील पालकांनी आपल्या मुलांना नगरपरिषद शाळांमध्ये प्रवेश घ्यावा असे आवाहन करण्यात आले आहे.


शिरूर नगरपरिषद प्राथमिक शाळा क्रमांक एकने विद्यार्थ्यांसाठी उचललेले पाऊल कौतुकास्पद आहे. मोफत शिक्षण, सीबीएसई पॅटर्न आणि आधुनिक सुविधा देण्याची त्यांची तयारी नक्कीच गरजू व होतकरू विद्यार्थ्यांसाठी फायद्याची ठरेल.


उत्कृष्ट शिक्षण आणि सीबीएसई पॅटर्न: आता शिरूरमधील विद्यार्थ्यांना नगरपालिकेच्या शाळेतही सीबीएसई अभ्यासक्रमाचे शिक्षण घेता येणार आहे, हे निश्चितच एक चांगली बाब आहे.

शिक्षकांची तयारी: शाळेतील मुख्याध्यापक आणि शिक्षक विद्यार्थ्यांसाठी उत्तम शिक्षण देण्यासाठी प्रयत्नशील आहेत, हे सकारात्मक आहे.

गैरसमज दूर करण्याचा प्रयत्न: अनेक पालकांचा सरकारी शाळांबद्दल असलेला नकारात्मक दृष्टिकोन बदलण्यासाठी शाळेचा हा प्रयत्न महत्त्वाचा आहे. पूर्वी याच शाळांमधून अनेक उच्चपदस्थ अधिकारी आणि प्रतिष्ठित नागरिक घडले आहेत, आजही त्यांचाच दबदबा सर्वच क्षेत्रात आहे.

सुविधा आणि उपक्रम नवीन इमारत: शाळेत नवीन इमारत, सुसज्ज प्रयोगशाळा, संगणक वर्ग, शिष्यवृत्ती योजना, क्रीडा प्रशिक्षण, कला व सृजनशील उपक्रम, विद्यार्थी सुरक्षा योजना आणि आनंददायी शिक्षण वातावरण यांसारख्या सुविधांमुळे विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास साधण्यास मदत होईल.

मुलींसाठी विशेष मार्गदर्शन आणि तंत्रज्ञान शिक्षण: मुलींसाठी असलेले विशेष मार्गदर्शन आणि तंत्रज्ञान शिक्षण आजच्या युगाची गरज आहे आणि ते या शाळेत उपलब्ध करणे प्रशंसनीय आहे.

. नगरपरिषद आणि जिल्हा परिषद शाळांनी अशाच प्रकारे गुणवत्ता सुधारण्यासाठी प्रयत्न केले, तर नक्कीच या शाळा पुन्हा एकदा विद्यार्थ्यांच्या गर्दीने फुलून जातील. शिरूर नगरपरिषद शाळा क्रमांक एकने दाखवलेला हा दृष्टिकोन इतर शाळांसाठीही प्रेरणादायी ठरू शकतो.


शाळेचे नाव उज्ज्वल!


नुकत्याच झालेल्या आंबेडकर जयंती निमित्त आयोजित वक्तृत्व स्पर्धेत, शाळेतील इयत्ता पहिली ते चौथीच्या गटात शुभांगी विकास पवार हिने पहिला क्रमांक पटकावला, तर स्वरा मयूर जाधव हिने दुसरा क्रमांक मिळवून शाळेचे नाव उंचावले आहे. या दोघी विद्यार्थिनींचे मनःपूर्वक अभिनंदन!


खेळांमध्येही शाळेची तयारी:


शाळेतील विद्यार्थ्यांसाठी क्रिकेट, खोखो आणि मैदानी खेळांचे विशेष प्रशिक्षण आयोजित करण्यात आले आहे. शिक्षिका संपदा राठोड व सचिन जाधव हे विद्यार्थ्यांना तालुका व जिल्हा स्तरावरील आंतरशालेय स्पर्धांसाठी संघ तयार करण्यासाठी मार्गदर्शन करीत आहेत.


       या विविध उपक्रमांसाठी शाळेच्या मुख्याध्यापिका उषा वेताळ, शिक्षक प्रतिभा आहेर, राजू लांघी, संपदा राठोड, आणि सचिन जाधव हे अथक परिश्रम घेत आहेत. 


        शिरूर नगर परिषद शाळा क्रमांक एक ही विद्यार्थी केंद्रबिंदू समजून विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास व्हावा याकडे लक्ष देत असून, शाळेची गुणवत्ता व नावलौकिक वाढवण्यासाठी प्रयत्न सुरू असून यांना लवकरच शाळा नवीन इमारतीमध्ये जात आहे. पालकांनी आपल्या मुलांना नगरपरिषद शाळांमध्ये प्रवेश घ्यावा. 

        उषा वेताळ, मुख्याध्यापिका शाळा क्रमांक एक


     


Tags

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा (0)

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!