शिरूर येथे विवाहितेच्या छळप्रकरणी सासू व पतीविरुद्ध गुन्हा दाखल
शिरूर, प्रतिनिधी
विवाहितेला मारहाण व छळवणूक केल्याप्रकरणी विवाहितेचा पती व सासू यांच्यावर शिरूर पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत मयुरी आदित्य चिखले (वय 27 वर्षे सध्या रा. प्रीतम प्रकाश नगर 5 वा मजला शिरूर ता. शिरूर ) यांनी फिर्याद दिली आहे.
याप्रकरणी विवाहितेचा पती आदित्य नरेंद्र चिखले , सासू संगीता नरेंद्र चिखले (रा.ए 905 बालाजी विश्व आयडियल डेव्हलपर्स डीमार्ट च्या समोर मोशी पुणे जि. पुणे ) यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती पुढीलप्रमाणे दिनांक 25 मे 2022 रोज ते 28 एप्रिल 25 पर्यंत फिर्यादीचे पती आदित्य नरेंद्र चिखले सासु संगीता नरेंद्र चिखले यांनी माहेरून पैसे आणण्यास सांगून माझे सोबत किरकोळ कौटुंबिक कारणावरून वाद घालून मला हाताने मारहाण करून शिव्या करून माझा शारीरिक व मानसिक छळ केला आहे. याबाबत शिरूर पोलीस स्टेशन येथे मारहाण व छळवणूक करण्याबाबत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत पुढील तपास शिरूर पोलीस निरीक्षक संदेश केंजळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस हवालदार राऊत करीत आहे.