शिरूर शहरात महीलांच्या गळ्यातील दागिने चोरणाऱ्या टोळीला शिरूर पोलीस स्टेशनच्या तपास पथकाने जेरबंद
शिरूर प्रतिनिधी
शिरूर शहरात पायी चालणाऱ्या महिलांच्या गळ्यातील सोन्याचे दागिने जबरदस्तीने ओढून चोरून नेऊन धुमाकूळ घालणाऱ्या दोन चोरट्यांच्या टोळीला शिरूर पोलीस स्टेशनच्या तपास पथकाने परजिल्ह्यातून मुसक्याआवळल्या असल्याची माहिती शिरूर पोलिस स्टेशन पोलिस निरीक्षक संदेश केंजळे यांनी दिली असून या आरोपींनी पाच गुन्ह्याची कबुली दिली आहे. तर त्यांचा एक साथीदार फरार आहे.
शिरूर पोलिसांनी दमदार कारवाई करून महिलांची दागिने चोरणाऱ्या चोरट्यांना अटक केल्यामुळे शिरूर शहरातील महिलांनी शिरूर पोलिसांचे अभिनंदन केले आहे.
याप्रकरणी गणेश सुनील गायकवाड (वय २१ वर्ष, रा. सारसनगर, शांतीनगर, सोलापुर रोड, अहिल्यानगर ता जि अहिल्यानगर),करण नरसी वाघेला( वय २४ वर्ष, रा. संजयनगर, काटवन खंडोबा, स्टेशन रोड, अहिल्यानगर ता.जि अहिल्यानगर) या दोघांना अटक करण्यात आली असून त्यांचा साथीदार साजीद सलीम शेख (रा. अहिल्यानगर, ता.जि अहिल्यानगर) हा फरार झाला आहे.
याबाबत शिरूर पोलिसांनी दिलेली माहिती पुढील प्रमाणे दिनांक २६ जानेवारी रोजी रात्री साडेनऊ वाजता जोशी वाडी येथे हायवे वर पाय जात असताना महिलेच्या गळ्यातील पाऊण तोळे किमतीचे सोन्याचे मंगळसूत्र स्कुटी मोटर सायकल वरून आलेल्या दोघांनी जबरदस्तीने चोरून नेले होते. याबाबत शिरूर पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला होता. तर शिरूर पोलीस स्टेशन हद्दीत अशाच प्रकारचे अनेक गुन्हे दाखल असल्याने शिरूर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक संदेश केंजळे यांनी गंभीर घेऊन शिरूर पोलीस स्टेशनचे तपास पथकाला या गुन्ह्याचे तपास करण्याचे आदेश दिले होते.
शिरूर पोलीस स्टेशनच्या तपास पथकाची पोलीस उपनिरीक्षक शुभम चव्हाण, पोलिस अंमलदार हे यातील पाहीजे आरोपींचा शोध घेत असताना पोलीस अंमलदार नितेश थोरात व विजय शिंदे यांनी सीसीटिव्ही फुटेज व तांत्रिक विश्लेषनाचे आधारे सदर गुन्हयातील आरोपी शोधले हे आरोपी अहिल्यानगर परिसरातील असल्याचे निष्पन्न झाले .
पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षक पंकज देशमुख, पुणे विभाग अप्पर पोलीस अधीक्षक रमेश चोपडे, शिरूर उपविभागीय अधिकारी प्रशांत ढोले यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक संदेश केंजळे यांनी पोलिस उप निरीक्षक शुभम चव्हाण, पोलीस अंमलदार नितेश थोरात, विजय शिंदे, निरज पिसाळ, सचिन भोई, नाथसाहेब जगताप,निखिल रावडे, रविंद्र आव्हाड, अजय पाटील यांचे एक पथक तयार करून अहील्यानगर येथे जावुन सापळा रचून आरोपी गणेश गायकवाड, करण वाघेला यांना पकडले. त्यांना पोलिसी खाक्या दाखवताच त्यांनी शिरूर परिसरात त्यांचा साथीदार साजीद शेख याच्या बरोबरीने महिलांचे मंगळसूत्र चोरीचे पाच गुन्हे केल्याचे कबुली दिली आहे. दोन आरोपींना अटक केली असून आरोपी साजीद शेख फरार आहे. त्याने गुन्ह्यात चोरलेले दागिने वडील आजारी असल्याचे कारण दाखवून सोनारकडे ठेवले होते. ते पोलिस पथकाने जप्त केले आहे. साजीद याच्याकडून आणखी गुन्हे उघडीस येतील असेही पोलिस निरीक्षक संदेश केंजळे यांनी सांगितले आहे.
सदरची कार्यवाही ही पोलीस अधिक्षक पंकज देशमुख, अप्पर पोलीस अधिक्षक रमेश चोपडे, उपविभागीय पोलीस अधिकारी प्रशांत ढोले, पोलीस निरीक्षक संदेश केंजळे यांचे मार्गदर्शनाखाली शिरूर पोलीस ठाणे गुन्हे शोध पथकाचे पोसई श्री. शुभम चव्हाण, पोलीस हवालदार नाथसाहेब जगताप, पोलीस अमंलदार विजय शिंदे, नितेश थोरात, निरज पिसाळ, सचिन भोई, रविंद्र आव्हाड, निखील रावडे, अजय पाटील यांवे पोलीस पथकाने केली आहे