शिरूर,प्रतिनिधी
पाबळ ता. शिरूर येथे महाविद्यालयात पायी जात असलेल्या अल्पवयीन युवतींचा गावातील तिघा तरुणांनी पाठलाग करून दुचाकी आडवी लावून अश्लील हावभाव करून विनयभंग केल्याप्रकरणी तीन तरुणांवर शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे विनयभंगाचा व पोस्को अंतर्गत गुन्हा दाखल करून अटक केली आहे.
केल्याची घटना घडली. याप्रकरणी प्रसाद रमाकांत रत्नपारखी, ओंकार बिपिन धोंगडे आणि अजय ऊर्फ मोनू नवनाथ पिंगळे (सर्व रा.पाबळ, ता. शिरूर), या तीन तरुणांना अटक केली आहे.
याबाबत पीडीत युवतीने शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे फिर्याद दाखल केली आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती पुढील प्रमाणे पीडित युवती तिच्या मैत्रिणींसोबत महाविद्यालयात जात असताना तिघांनी दुचाकीवरून तिचा पाठलाग केला. त्यानंतर वाटेत दुचाकी आडवी लावत अश्लील हावभाव करत युवतीच्या मनात लज्जा उत्पन्न होईल, असे वर्तन केले. या प्रसंगामुळे घाबरलेल्या युवतीने जवळच असलेल्या ओळखीच्या व्यक्तींना ही घटना सांगितली. मात्र या तिघांनी संबंधित व्यक्तीला ही दमदाटी केली.
याप्रकरणी पीडित युवतीने शिक्रापूर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. पोलिसांनी तातडीने गुन्हा दाखल करत तिघांना अटक केली. पुढील तपास शिक्रापूर पोलिस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक विजय मस्कर करत
आहे.