पिंपळे जगतापमध्ये जखमी मोराला जीवदान

9 Star News
0

 पिंपळे जगतापमध्ये जखमी मोराला जीवदान


शिरूर प्रतिनिधी 

( प्रतिनिधी ) पिंपळे जगताप ता. शिरुर येथे सुनील टाकळकर यांना एक मोर जखमी अवस्थेत दिसून आला, याबाबतची माहिती मिळताच नेचर गार्ड ऑर्गनायजेशन संस्थेचे अध्यक्ष गणेश टिळेकर, निसर्ग वन्यजीव सामाजिक संस्थेचे अध्यक्ष शेरखान शेख, विष्णू हाक्के यांनी सदर ठिकाणी जात पाहणी केली असता मोराच्या पायाला इजा झाल्याचे दिसून आले, दरम्यान प्राणीमित्रांनी सदर मोराला ताब्यात घेत त्याबाबतची माहिती शिरुर वनपरिक्षेत्र अधिकारी निळकंठ गव्हाणे यांना देत जखमी मोराला बावधन येथील शासकीय प्राणी अनाथालय येथे श्रीनाथ चव्हाण व इजाज शेख यांच्या माध्यमातून उपचारासाठी दाखल करत जखमी मोराला जीवदान दिले असून यावेळी बोलताना भारताच्या राष्ट्रीय पक्षाला जीवदान दिल्याचे समाधान वाटत असल्याचे प्राणीमित्रांनी सांगितले.

फोटो खालील ओळ – पिंपळे जगताप ता. शिरुर येथील जखमी मोराला जीवदान देताना प्राणीमित्र.

Tags

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा (0)

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!