शिवाजीनगर सत्र न्यायालयात शिरूर तालुक्यातील दोघांना दोन वर्षांची साधी कैद आणि दंडाची शिक्षा ठोठावली

9 Star News
0

 शिवाजीनगर सत्र न्यायालयात शिरूर तालुक्यातील दोघांना दोन वर्षांची साधी कैद आणि दंडाची शिक्षा ठोठावली 



पुणे, २८ एप्रिल २०२५ – शिवाजीनगर येथील सत्र न्यायालयात आज न्यायमूर्ती  ए. आय. पेरमपल्ली यांनी २००५ मध्ये दाखल गुन्ह्यात दोन आरोपींना दोषी ठरवत दोन वर्षांची साधी कैद व प्रत्येकी एक हजार रुपयांच्या दंडाची शिक्षा सुनावली.

ही कारवाई शिरुर पोलीस स्टेशनमध्ये दाखल असलेल्या गुन्हा क्रमांक ५१/२००५ अन्वये करण्यात आली. या प्रकरणात भादंवि कलम ३५३, ३२३, ५०४, ५०६, ३४ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता. संबंधित विशेष केस क्रमांक २६३/२०१९ होती.

 पोपट भाऊसो घोडे (वय ७४ वर्षे, रा. हाजी टाकळी, ता. शिरूर, जि. पुणे), बाळू पोपट घोडे (वय ४३ वर्षे, रा. हाजी टाकळी, ता. शिरूर, जि. पुणे) या आरोपींना दोषी ठरवून शिक्षा ठोठावली आहे.
      न्यायालयाने आरोपींना भारतीय दंड संहितेच्या कलम ३५३ (शासकीय कर्तव्य बजावताना अडथळा) आणि ३२३ (ईजा) अन्वये दोषी ठरवले असून, प्रत्येकी २ वर्षे साधी कैद व एक हजार रुपये दंड अशी शिक्षा ठोठावली. दंड न भरल्यास एक महिना अतिरिक्त कारावासाची तरतूद करण्यात आली आहे.
       या प्रकरणाचा तपास मयत पोलीस हवालदार एच. एम. लगड व निवृत्त पोलीस निरीक्षक  शंकर केंगार यांनी केला होता. सरकारी पक्षातर्फे सरकारी वकील  प्रदीप गेहलोत यांनी काम पाहिले.
    या खटल्यासाठी पोलीस निरीक्षक  संदेश केंजळे हे प्रभारी अधिकारी होते, तर कोर्ट पैरवी कर्मचारी म्हणून पो. हवा. बाळासाहेब गदादे व म.पोकाॅ. रेणुका भिसे यांनी काम पाहिले. सेशन कोर्टात पैरवीसाठी श्रेणी पीएसआय  विद्याधर निचीत कार्यरत होते, तर जिल्हा कोर्टात  संतोष घोळवे यांनी पैरवी अधिकारी म्हणून जबाबदारी सांभाळली.

गुन्हा नोंदवून जवळपास २० वर्षांनी आज न्यायालयाने निकाल देत आरोपींना दोषी ठरवले असून, न्यायप्रक्रियेवर जनतेचा विश्वास दृढ होण्यास हातभार लागला आहे.



टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा (0)

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!