सावधान! शिरूर बाबुरावनगर परिसरात मध्यरात्रीच्या सुमारास चोरट्यांचा वावर ...
शिरूर प्रतिनिधी
शिरूर शहराजवळील बाबुराव नगर परिसरात मध्यरात्रीच्या वेळेस मोटर सायकल व घरफोडी करणारी चोर फिरत असून या भागातील नागरिकांनी सतर्क राहण्याची आव्हान करण्यात आले आहे. तर या या परिसरात फिरणारे चोर सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये कैद झाले आहे.
शिरूर शहराजवळ असणारी बाबुराव नगर ही मोठी वसाहत असून, या परिसरातील अनेक ठिकाणी रात्रीच्या वेळेस हत्यार बंद चोर फिरत आहे.
बाबुराव नगर येथील मधुकोष सोसायटी येथील सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये हे चोर कैद झाले आहेत.
शिरूर बाबुराव नगर परिसरात मोठ्या प्रमाणात रात्रीच्या वेळी तरुणांचा धिंगाणा सुरू असतो. त्यात नशेडी तरुणांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढत आहे.
बाबुराव नगर म्हणजे गुन्हेगार सतत या भागात फिरत असतात. काल रात्री या भागात चार ते सहा चोरांची टोळके फिरत असताना दिसून आले तर एका सोसायटीमध्ये मोटर सायकल चोरी करताना दिसून येत आहेत.
त्यामुळे शिरूर बाबुराव नगर परिसरातील नागरिकांनी सतर्क राहणे गरजेचे असून या भागात शिरूर पोलिसांनी ही रात्रीच्या वेळेस गस्त घालावी अशी मागणी नागरिकांमधून होत आहे.
सदर चोरटे सीसीटीव्हीत कै झाले असून पोलिसांनी याची पाहणी करून संबंधित चोरांचा शोध घेऊन त्यांच्यावर गुन्हे दाखल करावे अशी मागणी ही नागरिकांनी केली आहे
. बाबुराव नगर मध्ये रात्री चार ते सहा जण चोरटे फिरत होते संबंधित व्हिडिओम मधुकोष सोसायटी मधला असून दोन वर्षांपूर्वी आमचे नवीन एक्टिवा चोरी गेली होती अजून तिचा तपास लागलेला नाही. काल रात्री या परिसरात फिरणारे चोर सीसीटीव्ही मध्ये दिसत आहेत.
शशिकांत गवळी, स्थानिक नागरिक बाबुराव नगर