शिरूर तालुक्यातील ९६ ग्रामपंचायतीच्या आरक्षण सोडत जाहीर..

9 Star News
0

 शिरूर तालुक्यातील ९६ ग्रामपंचायतीच्या आरक्षण सोडत जाहीर...

शिरूर दिनांक प्रतिनिधी

शिरूर दिनांक प्रतिनिधी
    
  शिरूर तालुक्यातील ९६ ग्रामपंचायतीची आज सरपंच पदाची आरक्षण सोडत आज् काढण्यात आली. मोठ्या प्रमाणात नागरिकांनी गर्दी केली होती.आरक्षणामुळे अनेक ग्रामपंचायतीमध्ये कभी खुशी कभी गम परिस्थिती निर्माण झाली आहे.

       शिरूर तालुक्‍यात सरपंच पदाच्या आरक्षण सोडतीची उत्सुकता लागली होती परंतु येथील महत्त्वाच्या वडगाव रासाई,
    सरपंच पदाची आरक्षण सोडत तहसील आय कार्यालयात २३ एप्रिल दुपारी १२ वाजता प्रांत अधिकारी पूनम अहिरे,तहसीलदार बाळासाहेब म्हस्के यांच्या उपस्थितीत शिरूर प्रशासकीय इमारती तिसऱ्या मजल्यावर काढण्यात आली. यावेळी निवासी नायब तहसीलदार प्रकाश मुसळे उपस्थित होते.
     आरक्षण सोडतीची चिठ्ठी शिरूर येथील समीक्षा राहुल गिरमकर व वरज साहेबराव जाधव शालेय विद्यार्थींच्या हस्ते काढण्यात आल्या.
    शिरूर तालुक्‍यातील एकूण ९६ ग्रामपंचायतच्या सरपंच पदाचे आरक्षण जाहीर होणार आहे. 
         त्यामध्ये  ५९ जागा सर्वसाधारणसाठी आरक्षित आहेत पैकी  सर्वसाधारण ३० महिलांना तर २९ सर्वसाधारण सरपंचपदाची संधी मिळणार आहे. 
    तर नागरिकांचा मागास प्रवर्गासाठी २६ जागा आरक्षित ठेवल्या आहेत.यात १३ महिला सरपंच,१३ नागरिकांचा मागास प्रवर्गासाठी जागा आरक्षित आहेत.
     अनुसूचित जमातीसाठी ३ पैकी २ महिलांना सरपंच जागा आरक्षित, तर १ अनुसूचित जाती साठी,
      अनुसूचित जातीसाठी  ८ पैकी ४ महिलांना तर ४ जागा अनुसूचित जाती  सरपंच जागा आरक्षित आहेत. 
      ९६ ग्रामपंचायत पैकी सात ग्रामपंचायत आरक्षण २७/२/२५ जिल्हाधिकारी यांनी अगोदरच जाहीर केले आहे.
       त्यामुळे या ग्रामपंचायत सोडून ८९ ग्रामपंचायत ची आरक्षण सोडत आज काढण्यात आली.
        अशा प्रकारे शिरूर तालुक्‍यातील ९६ ग्रामपंचायत सरपंचपदाची आरक्षण सोडत पुढील प्रमाणे 
      ग्रामपंचायत निहाय आरक्षण पुढीप्रमाणे 
अनुसूचित जाती महिला- मुखई, वढू बुद्रुक, गोलेगाव,जांबुत,
अनुसूचित जाती सर्वसाधारण - आमदाबाद,हिवरे, वाजेवाडी, निमगाव म्हाळुंगी 
 
अनुसूचित जमाती महीला आरक्षण - माळवाडी, वडगाव रासाई 
अनुसूचित जमाती सर्वसाधारण - कुरुळी

नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला 
रावडेवाडी, निमोणे,निमगाव भोगी , पिंपरी दुमाला, शरद वाडी, म्हसे बुद्रुक, पिंपळे जगताप, सादलगाव, नागरगाव ,पिंपळसूटी, वाडा पुनर्वसन,करडे, चव्हाणवाडी,

नागरिकांचा प्रवर्ग सर्वसाधारण 
आंधळगाव, अण्णापूर,कारेगाव, कोळगाव डोळस, मिडगुलवाडी ,गनेगाव दुमाला, वाघाळे ,पारोडी, खंडाळे, फाकटे, कवठे यमाई, कान्हूर मेसाई, कासारी



सर्वसाधारण महिला 
टाकळी भीमा ,आपटी, केंदूर ,कोरेगाव भीमा, चिंचोली मोराची, शिंदोडी, उरळगाव ,गणेगाव दुमाला ,पाबळ, भांबर्डे ,बुरुंजवाडी, खैरेनगर ,विठ्ठलवाडी, आलेगाव पागा ,शिक्रापूर, मोटेवाडी, डिग्रजवाडी, कोंढापुरी, पिंपरखेड, वरुडे, निमगाव दुडे ,निर्वी, बाभूळसर बुद्रुक, तरडोबाची वाडी, न्हावरा ,दरेकरवाडी, गुनाट,आंबळे, धानोरे, कळवंतवाडी.

सर्वसाधारण 
चिंचणी ,शिरूर ग्रामीण , काठापुर खुर्द, वडनेर खुर्द, शिरसगाव काटा, टाकळीहाजी, चाडोह, करंदी, रांजणगाव सांडस, तांदळी, कर्डेलवाडी,मांडवगण फराटा ,तळेगाव ढमढेरे, सोने सांगवी, दहिवडी, सणसवाडी मलठण रांजणगाव गणपती बाबूळ सर खुर्द, सविंदणे,सरदवाडी, जातेगाव बुद्रुक, धामारी, इनामगाव, जातेगाव खुर्द, खैरेवाडी, करंजावणे, पिंपळे खालसा, ढोकसांगवी



















Tags

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा (0)

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!