पूजेच्या आमंत्रणाच्या बहाण्याने महिलेचे सोन्याचे गंठण पळविले... तळेगाव ढमढेरेत घटना, दोन अज्ञातांवर गुन्हा

9 Star News
0

 पूजेच्या आमंत्रणाच्या बहाण्याने महिलेचे सोन्याचे गंठण पळविले... तळेगाव ढमढेरेत घटना, दोन अज्ञातांवर गुन्हा


शिरूर (प्रतिनिधी):

शिरूर तालुक्यातील तळेगाव ढमढेरे येथे एक धक्कादायक घटना घडली आहे. पूजेच्या आमंत्रणाच्या बहाण्याने दोन अनोळखी व्यक्तींनी एका महिलेच्या गळ्यातील दोन तोळ्यांचे सोन्याचे गंठण हिसकावून मोटारसायकलवरून पळ काढला. या प्रकरणी शिक्रापूर पोलिसांनी दोन अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल केला आहे.


तळेगाव ढमढेरे येथील तुषार ढमढेरे यांच्या आत्या सुरेखा साळुंखे या आपल्या घरासमोर उभ्या असताना, एका दुचाकीवरून आलेल्या दोघा व्यक्तींनी त्यांच्याशी संपर्क साधला. त्यांनी “पूजेचे आमंत्रण द्यायला आलो आहोत, पायाला पाणी द्या,” अशी विनंती केली. सुरेखा साळुंखे या पाणी आणण्यासाठी वळल्या असता, एका व्यक्तीने त्यांच्या गळ्यातील दोन तोळ्यांचे सोन्याचे गंठण हिसकावले आणि दोघेही तिथून दुचाकीवरून पसार झाले.


ही घटना घडल्यानंतर तुषार जनार्दन ढमढेरे (वय ३४, रा. काटे आळी, तळेगाव ढमढेरे) यांनी शिक्रापूर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. पोलिसांनी अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल केला असून, पोलीस हवालदार अमोल चव्हाण या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.


या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून, नागरिकांनी अनोळखी व्यक्तींशी व्यवहार करताना सावधगिरी बाळगावी, असे आवाहन पोलिसांनी के

ले आहे.


टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा (0)

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!