शिक्रापुरात वेश्याव्यवसायावर पोलिसांचा छापा
दोघांवर गुन्हे दाखल तर महिलेची महिला सुधार गृहात रवानगी
( प्रतिनिधी ) शिक्रापूर ता. शिरुर येथील पाबळ चौक परिसरातील ऐश्वर्या लॉजवर सुरु असलेल्या वेश्याव्यवसाय वर पोलिसांनी छापा टाकत कारवाई करुन एका इसमासह महिलेवर गुन्हा दाखल करुन महिलेची सुटका करुन महिलेची पुण्यातील महिला सुधारगृहात रवानगी केली आहे.
शिक्रापूर ता. शिरुर येथील पाबळ चौक परिसरातील ऐश्वर्या लॉजवर एक इसम महिलेकडून वेश्याव्यवसाय करुन घेत असल्याची माहिती पोलीस निरीक्षक दिपरतन गायकवाड यांना त्यांनतर पोलीस उपनिरीक्षक महेश डोंगरे, पोलीस हवालदार श्रीमंत होनमाने, अमोल दांडगे, रोहिदास पारखे, विकास पाटील, महिला पोलीस शिपाई रुपाली खोटे यांनी सदर ठिकाणी जाऊन बनावट ग्राहक पाठवून पाहणी केली असता एक महिला वेश्याव्यवसाय करत असल्याचे दिसून आले, दरम्यान पोलिसांनी सदर महिलेला ताब्यात घेत कारवाई केली, याबाबत शिक्रापूर पोलीस स्टेशनचे पोलीस हवालदार श्रीमंत सर्जेराव होनमाने रा. शिक्रापूर ता. शिरुर जि. पुणे यांनी शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे फिर्याद दिल्याने शिक्रापूर पोलिसांनी वेश्याव्यवसाय चालवणाऱ्या राकेश ( पूर्ण नाव पत्ता माहित नाही ) याचेसह एका महिलेवर गुन्हा दाखल करत महिलेची रवानगी पुण्यातील महिला सुधार गृहात केली असून पुढील तपास पोलीस निरीक्षक दिपरतन गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक महेश डोंगरे हे करत आ
हे.