शिरूर, प्रतिनिधी
शिरूर जवळ बोऱ्हाडेमळा अहिल्यानगर पुणे महामार्गावर कल्याणी हॉटेल समोर चारचाकी वाहनात झोपलेल्या महिलेला दोघां चोरट्यांनी चाकूचा धाक दाखवत महिलेकडील सव्वा तोळे सोन्याचे दागिने ९१ हजार किमंतीचे दागिने बळजबरीने चोरुन नेले आहेत .
याबाबत सुलोचना दुधाराम राठोड (वय ४० वर्षे व्यवसाय मजुरी रा. उत्तरवाडोना, ता. नेर जि. यवतमाळ) यांनी याबाबत फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दोन अनोळखी इसमा विरोधात गुन्हा दाखल केला आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती पुढीलप्रमाणे फिर्यादीच्या फिर्यादीवरून दिनांक ३ एप्रिल २०२५ रोजी पहाटे साडेचारचा वाजण्याच्या सुमारास पुणे अहिल्यानगर रस्त्यावर शिरुर जवळील बो-हाडे मळा येथील कल्याणी हॉटेल समोर अहिल्यानगर पुणे रोडचे पुणे बाजूला सुलोचना राठोड यांचा चुलत भाऊ यास झोप लागल्यान त्यांनी त्यांची चार चाकी गाडी क्र . एम. एच. ३७ ए .डी .८९०७ रस्त्याच्या कडेला थांबवून गाडी मध्ये सर्वजण झोपलेले असताना दोन अनोळखी इसमांनी आवाज देऊन गाडीचा दरवाजा उघडण्यास सांगितला. त्यातील एकाने चाकूचा धाक दाखवून राठोड यांच्या गळ्यामधील सोन्याचे मणी मंगळसूत्र व कंठण जबरदस्तीने हिसकावून घेतले व भीतीने राठोड यांनी कानातील रिंगाही काढून दिल्या. शिरूर पोलीस स्टेशन येथे फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास पोलीस निरीक्षक संदेश केंजळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक नकाते तपास करीत आहे .