काल झालेल्या वादळी वाऱ्याने व विजेच्या कडकड झाडाला आग तर पोलीस स्टेशन परिसरात झाडाच्या फांदी तुटून मोटरसायकलचे नुकसान
शिरूर प्रतिनिधी
शिरूर शहर व परिसरात सोसाट्याच्या वाऱ्यासह अवकाळी पावसाने हजेरी लावली असून, वादळी वाऱ्यासह विजेता कडकडाट यामुळे नागरिकांत भीतीचे वातावरण निर्माण झाले होते तर एका ठिकाणी नारळाच्या झाडावर वीज पडून झाड आणि पेड घेतला तर पोलीस स्टेशन येथे झाडाची फांदी तुटून मोटरसायकलचे व काही ठिकाणी शेती मालाचे नुकसान झाले आहे.
वादळ, विजांच्या गडगडाटाने अनेक भागात वीजपुरवठा खंडित झाला. तर वादळी वाऱ्याने फुफाटा आकाशात उंच उडाला होता तर विजेच्या आवाजाने काहीसे घबराटीचे वातावरण पसरले.
सायंकाळच्या सुमारास वादळी वाऱ्यासह काही काळ
मध्यम स्वरूपाचा पाऊस झाला.
रेणुका माता मंदिराजवळ एका नारळाच्या झाडावर वीज कोसळल्याने झाडाला आग लागली. शिरूर पोलीस स्टेशन येथे झाडाची फांदी तुटल्याने मोटरसायकलचे नुकसान झाले .
तर काही ठिकाणी आंब्याच्या झाडाला आलेला मोहर वाऱ्याने गळून पडला. तर अनेक ठिकाणी वाळलेला पाला काही झाडांच्या छोट्या-मोठ्या शेंगा, तर सुकलेल्या छोट्या-मोठ्या फांद्या रस्त्यावर पडलेल्या दिसत होत्या.
तर काही ठिकाणी अचानक बरसलेल्या पावसाने काढून ठेवलेला कांदा शेतात भिजला.
शिरूर शहरासह बाबूराव नगर, जुने शिरूर (रामलिंग) पाषाणमळा, बोऱ्हाडेमळा, तर्डोबाची वाडी, याभागात तुरळक पाऊस झाल्याने शेतीमालाचे नुकसान झाले तर सोसाट्याच्या वाऱ्यामुळे दुकानांचे बोर्ड, रस्त्याच्याकडेचे फलक देखील वाऱ्याने पडले होते परंतु गेली काही दिवसांपासून वातावरणात असलेली उष्णता यामुळे नागरिक हैराण झाला होता परंतु झालेल्या पावसामुळे वातावरणात गारवा पसरल्याने नागरिक सुखावला होता तर बळीराजा दुखावला असल्याचे दिसून आले.