शिक्रापुरात महिलेचा पाठलाग करणाऱ्यावर गुन्हा
शिक्रापूर, ता. २९ (शिरूर प्रतिनिधी):
कामावर जाणाऱ्या महिलेचा सातत्याने पाठलाग करणाऱ्या एका युवकावर शिक्रापूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ओम भगवान आमटे (रा. पाबळ चौक, शिक्रापूर) असे आरोपीचे नाव आहे.
सकाळच्या सुमारास महिला नेहमीप्रमाणे कामावर जात असताना आरोपी दुचाकीवरून लपून बसला होता. महिला घरातून बाहेर पडताच त्याने पुन्हा पाठलाग सुरू केला. यावेळी महिलेने आरडाओरड केल्यावर परिसरातील नागरिकांनी तत्काळ धाव घेत आरोपीला पकडले आणि पोलिसांच्या ताब्यात दिले.
महिलेच्या फिर्यादीवरून शिक्रापूर पोलिसांनी ओम आमटे याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला असून, पुढील तपास महिला पोलीस हवालदार निता चव्हाण करीत आहे