मी पुण्याचा डॉन आहे" म्हणत पोलिसाला धमकी; धक्काबुक्की गुन्हा दाखल

9 Star News
0

 "मी पुण्याचा डॉन आहे" म्हणत पोलिसाला धमकी; धक्काबुक्की गुन्हा दाखल


शिरूर प्रतिनिधी 

सणसवाडी (ता. शिरूर) येथे दोन कारमध्ये झालेल्या अपघातानंतर पोलिसांवर हल्ला करत धमकी दिल्याची घटना घडली. ऋषिकेश हरिषचंद्र गुंजाळ (वय २९, रा. पांडवनगर गुंजाळवाडी, पुणे) याच्याविरोधात शिक्रापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


पुणे-नगर महामार्गावर कार (एमएच १६ डीसी ०४७५) ला पाठीमागून आलेल्या दुसऱ्या कारने (एमएच १२ सीवाय ५०२०) धडक दिली. यानंतर दोघांमध्ये वाद झाला. डायल ११२ वर कॉल झाल्यानंतर पोलीस घटनास्थळी पोहोचले. माहिती भरत असताना गुंजाळ याने पोलिसाच्या हातातील डायल ११२ मशीन हिसकावून घेत, पोलिसाला धक्काबुक्की केली. "मी बाऊंसर आणि पुण्याचा डॉन आहे, जेलरला संपवलं, तुलाही संपवेन," अशी धमकी देत मारहाण केली.


शिक्रापूर पोलिसांनी तात्काळ हस्तक्षेप करत गुंजाळ याला अटक केली असून, पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक दीपरत्न गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली करीत आहे






टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा (0)

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!