आमदार माऊली कटके यांचा शिरूर येथे जनता दरबार... शेतकऱ्यांबरोबर साखळी उपसा जलसिंचन योजनेला आमचाही विरोध... घोडगंगा लवकरच सुरू होणार - माऊली कटके

9 Star News
0

 आमदार माऊली कटके यांचा शिरूर येथे जनता दरबार... शेतकऱ्यांबरोबर साखळी उपसा जलसिंचन योजनेला आमचाही विरोध... घोडगंगा लवकरच सुरू होणार - माऊली कटके 


शिरूर प्रतिनिधी 

          शिरूर तालुक्यातील घोडगंगा सहकारी साखर कारखाना सुरू करण्यासाठी सव्वा तीनशे कोटीचा प्रस्ताव राज्य शासनाकडे दिला असून, लवकरच कारखाना सुरू करण्यासाठीच्या हालचाली सुरू असल्याचे शिरूर चे आमदार ज्ञानेश्वर उर्फ माऊली कटके यांनी सांगून साखळाई उपसा जलसिंचन योजनेसाठी घोड धरणातून एक थेंबही पाणी देणार नसल्याचे त्यांनी यावेळी जनता दरबाराच्या माध्यमातून नागरिकांशी संवाद व त्यांचे प्रश्न मार्गी लावण्याचा प्रयत्न असल्याचे त्यांनी सांगितले .

           शिरूर तालुक्यातील नागरिकांच्या अडीअडचणी व विविध खात्यात असणारे प्रश्न ग्रामपंचायतींचे रखडलेले प्रकल्प प्रश्न यासाठी शिरूर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यालयात आमदार माऊली कटके यांच्यावतीने जनता दरबाराच्या आयोजन करण्यात आले होते या जनता दरबारात नागरिकांचा मोठा प्रतिसाद पाहाव्यास मिळाला. त्यावेळेस ते बोलत होते. 

        याच जनता दरबारामध्ये शिरूर तालुक्यातील अनेक ग्रामपंचायतीचे सरपंच उपसरपंच सर्वसामान्य नागरिक यांच्या शेकडो तक्रारी प्राप्त झाल्या होत्या तर काहीजणांची कामे रखडली होती या संदर्भात आमदार माऊली कटके यांनी ठोस निर्णय घेऊन जवळपास अनेक प्रकरणाचा जागीच निपटारा त्यांनी या जनता दरबारात केला आहे. 

         यामध्ये महसूल खात्यातील अनेक नागरिकांची प्रश्न प्रलंबित होते. त्याच्यात तक्रारी व प्रश्न जास्त असल्याचे दिसून आले.

          यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस

पक्षाचे शहराध्यक्ष शरद कालेवार, माजी उपनगराध्यक्ष जाकिरखान पठाण, घोडगंगा सहकारी साखर कारखान्याची संचालक दादापाटील फराटे, जिल्हा परिषदेचे माजी सदस्य राहुल पाचर्णे, राष्ट्रवादी महिला शहराध्यक्ष श्रुतिका झांबरे, भाजपच्या महिला शहराध्यक्ष प्रिया बिरादार, सुजाता पाटील, रंजन झांबरे, सुनिल जाधव स्वप्निल रेड्डी , महेंद्र सातव, जयवंत साळुंके, एजाज बागवान, हर्षद ओस्तवाल मोठ्या प्रमाणात नागरिक ग्रामपंचायतीचे सरपंच उपसरपंच उपस्थित होते. 

          शिरूर तालुक्यातील व हवेली तालुक्यातील नागरिकांची कामे जलद गतीने व्हावी सर्वसामान्य नागरिक शेतकरी यांना त्यांच्या कामासाठी व शेतकरी सर्वसामान्य नागरिक यांची समक्ष भेट घेऊन त्याचे प्रश्न, अडचणी जाणून घेण्यासाठी तसेच शासकीय कार्यालयामध्ये हेलपाटे मारू नये यासाठी जनता दरबाराचे आयोजन करण्यात आले असे आमदार माऊली कटके यांनी सांगितले. 

          शिरूर शहराला स्वच्छ पाणीपुरवठा झाला पाहिजे यासाठी प्रयत्नशील असून,शहरातील कचरा डेपोचा प्रश्न, क्रीडा संकुल, अत्याधुनिक शासकीय रुग्णालय यासाठी प्रयत्नशील असून, शहरातील टपरीधारकांचे पुनर्वसन व्हावे यासाठी ही प्रयत्न करणारा असले की त्यांनी सांगून घोडगंगा सहकारी साखर कारखाना लवकर सुरू व्हावा यासाठीच्या हालचाली सुरू असून राज्याचे उपमुख्यमंत्री तथा पालकमंत्री अजित पवार यांच्या मार्गदर्शनाखाली घोडगंगा सहकारी साखर कारखान्याने सव्वा तीनशे कोटी रुपयाचा कारखाना सुरू करण्यासाठीचा प्रस्ताव कारखान्याचे व्यवस्थापक यांच्यामार्फत दिला आहे हा प्रस्ताव लवकर मंजूर होऊन घोडगंगा सहकारी साखर कारखाना सुरू होणार असल्याचे कटके यांनी सांगितले. तर साखळाई उपसा जलसिंचन योजना या शिरूर तालुक्यातील शेतकऱ्यांचा विरोध होत असेल तर या योजनेसाठी घोड धरणातून एक थेंबही पाणी देऊ देणार नाही असे आमदार माऊली कटके यांनी सांगून शेतकऱ्यांना जिथे अडचण येईल तिथे शेतकऱ्यांच्या खांद्याला खांदा लावून काम करणार असल्याचे व त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचेही त्यांनी सांगितले.


Tags

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा (0)

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!