शिरूर मध्ये कृषी केंद्रात घुसुन कोयत्याने मारहाण करणा-या तीन आरोपींच्या आवळल्या मुसक्या" शिरूर पोलीसांची दमदार कामगिरी
शिरूर प्रतिनिधी
शिरूर येथील विशाल कृषी सेवा केंद्रात घुसून कोयत्याने हल्ला करून फरार झालेल्या तीन आरोपींना शिरूर पोलीस स्टेशनच्या पोलीस पथकाने जेरबंद केले असल्याची माहिती शिरूर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक संदेश केंजळे यांनी दिली आहे.
परवेज उर्फ पाप्या अस्लम पठाण (वय १९ वर्ष), रूपेश राजु चित्ते (वय २२ वर्ष),ओंकार दत्तात्रय जाधव (वय २६ वर्ष सर्व रा तर्डोबाची वाडी शिरूर ता शिरूर जि पुणे) यांना अटक करण्यात आली आहे.
याबाबत संतोष बाळू पाचर्णे (जांभळीमळाशिरूर यांनी फिर्याद दिली होती.
दिनांक पाच एप्रिल रोजी दुपारी दोन वाजता
शिरूर येथील विशाल कृषी सेवा केंद्र मध्ये येऊन आरोपी यांनी दहशत मधून तू आमच्या विरोधात तहसील कार्यालयात तक्रार देतो का तुला लय मस्ती आली का असे म्हणून वरील आरोपींनी फिर्यादीवर कोयता कात्री यांनी हल्ला करून जखमी करून, परिसरात कोयत्याची दहशत करून फरार झाले होते. ऐन बाजारपेठेत झालेल्या या आल्याची गंभीर दखल शिरूर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक संदेश केंजळे यांनी घेऊन शिरूर पोलीस स्टेशनच्या तपास पथकाला आरोपींना तात्काळ अटक करण्याच्या सूचना दिल्या होत्या.
शिरूर पोलीस स्टेशनच्या तपास पथकाने तांत्रिक माहिती व इतर गोपनीय बातमीदाराच्या माहितीवरून आरोपी पाप्या पठाण, रुपेश चित्ते, ओंकार जाधव या तिघांनाही अटक केली आहे.
ही कारवाई पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षक पंकज देशमुख, पुणे विभाग अप्पर पोलीस अधीक्षक रमेश चोपडे शिरूर उपविभागीय पोलीस अधिकारी प्रशांत ढोले, शिरूर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक संदेश केंजळे यांच्या मार्गदर्शनाखाली शिरूर पोलीस स्टेशन तपास पथकाचे स्टेशनचे पोलीस निरीक्षक यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक शुभम चव्हाण,सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक राजेंद्र साबळे,
पोलीस हवालदार नाथसाहेब जगताप, पोलीस अंमलदार सचिन भोई, नितेश थोरात, विजय शिंदे, निरज पिसाल, निखील रावडे, रविंद्र आव्हाड, अजय पाटील यांचे पोलीस पथकाने केली आहे.
शिरूर शहरामध्ये व पोलीस स्टेशन हद्दीमध्ये बाजारपेठेत घातक शस्त्रे, कोयता घेवुन दहशत करण्याचा कोणी प्रयत्न करत असेल तर त्याचेवर देखील प्रचलित कायदयान्वये कडक कारवाई करणार असल्याचे सांगीतले आहे.
शिरूर पोलीस निरीक्षक संदेश केंजळे
,