शिरूर येथे २२ व २३ एप्रिल रोजी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती व्याख्यानमाला -
शिरूर, प्रतिनिधी
शिरूर येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर विचार मंचाच्या वतीने भारतरत्न महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त दोन दिवसीय व्याख्यानमालेचे आयोजन करण्यात आले आहे. विचार मंचाच्या अध्यक्षा, माजी नगराध्यक्षा सुवर्णा लोळगे यांनी ही माहिती दिली. या व्याख्यानमालेचे हे दुसरे वर्ष आहे.
व्याख्यानमाला
* दिवस: मंगळवार, २२ एप्रिल
* वक्ता: संजय आवटे (संपादक, लोकमत)
* विषय: "शिवराय ते भीमराव"
* वेळ: सायंकाळी ६:३० वाजता
* दिवस: बुधवार, २३ एप्रिल
* वक्ता: सारंग आवाड (डी. आय. जी., सी. आय. डी., महाराष्ट्र)
* विषय: "कोवळी तरुणाई गुन्हेगारीच्या विळख्यात"
* वेळ: सायंकाळी ६:३० वाजता
स्थळ: राजभोग बँक्वेट हॉल, शिरूर
डॉ. बाबासाहेब आंबेडकर विचार मंचाच्या वतीने जास्तीत जास्त नागरिकांनी या ज्ञानवर्धक व्याख्यानमालेचा लाभ घ्यावा, असे आवाहन करण्या
त आले आहे.