शिरूर ग्रामीण ग्रामपंचायत कर्मचाऱ्यास मारहाण केल्याप्रकरणी एकावर शासकीय कामात अडथळा आणल्याप्रकरणी गुन्हा दाखल

9 Star News
0

 शिरूर ग्रामीण ग्रामपंचायत कर्मचाऱ्यास मारहाण केल्याप्रकरणी एकावर शासकीय कामात अडथळा आणल्याप्रकरणी गुन्हा दाखल 



शिरूर,प्रतिनिधी

       शिरूर ग्रामीण ग्रामपंचायतीच्या शासकीय पाणीपुरवठा योजनेसाठी चारी खोदण्याचे काम सुरू असताना एकाने सरकारी कर्मचाऱ्यांवर हल्ला करत मारहाण करून सुपारवायझराला उठाबशा काढण्यास लावून दहशत माजवत सरकारी कामात अडथळा आणल्या प्रकरणी शिरूर पोलिस स्टेशन येथे एकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

      आरोपीवर कडक कारवाई करावी यामागणीसाठी रामलिंग ग्रामपंचायत कर्मचारी यांनी काम बंद आंदोलन पुकारले आहे.

        याप्रकरणी अमित जयंत डोंगरे (रा. श्रीनिवास सोसायटी, रामलिंग रोड, शिरूर) याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

        अंकुश माणिक कु-हाडे (वय ४१ वर्ष,रा.रामलिंग,शिरूर ) यांनी फिर्याद दिली आहे.

         पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी अंकुश माणिक कु-हाडे (वय ४१ वर्ष ) व्यवसाय - पाणीपुरवठा, ग्रामपंचायत शिरूर ग्रामीण हे दिनांक २ एप्रिल रोजी दुपारी २ वाजता रामलिंग रोड, श्रीनिवास सोसायटी, शिरूर येथे जेसीबीच्या सहाय्याने चारी खोदण्याचे शासकीय काम करत होते. यावेळी आरोपी अमित याने आपल्या घरासमोरील पाईपचे काम का झाले नाही, या कारणावरून आक्षेप घेत कामात अडथळा निर्माण केला व फिर्यादी अंकुश कु-हाडे यांच्या कंबरेवर आणि मानेवर दगड मारून जखमी केले. तसेच त्यांच्यासोबत असलेल्या जेसीबी सुपरवायझर नाथा सुदाम शिंदे (रा. देवदैठण, ता. श्रीगोंदा, जि. अहिल्यानगर) यांनाही मारहाण केली. याशिवाय आरोपीने सुपरवायझरला सोसायटीतील प्रत्येक घरासमोर उठाबशा काढण्यास भाग पाडून दहशत निर्माण निर्माण करून सरकारी कामात अडथळा आणला आहे.

     त्यामुळे शिरूर ग्रामपंचायतीकडून तीव्र निषेध व्यक्त केला जात आहे. शिरूर ग्रामीण ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांनी काम बंद आंदोलन उभारले होते. तर आरोपीवर कडक कारवाई करावी अशी मागणी निवेदनाद्वारे शिरूर पोलिसाना केली आहे.

या प्रकरणातील दोषींवर कारवाई व्हावी यासाठी शिरुर ग्रामीणच्या सरपंच शिल्पा गायकवाड , उप सरपंच बाबाजी वर्पे व माजी सरपंच अरुण घावटे , विठ्ठल घावटे , माजी उपसरपंच भरत बो-हाडे व ग्रामपंचायत कर्मचारी यांच्या शिष्टमंडळाने पोलीस उपविभागीय आधिकारी प्रशांत ढोले व पोलीस निरीक्षक संदेश केंजळे यांची भेट घेतली .शिरूर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक संदेश केंजळे यांनी कारवाई करण्याचे आदेश दिल्यानंतर हे आंदोलन मागे घेण्यात आले.

       या प्रकरणी शिरूर पोलीस स्टेशन येथे फिर्याद दाखल करण्यात आली असून आरोपीविरुद्ध सरकारी कामात अडथळा व मारहाणीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या गुन्हयाचा पुढील तपास शिरूर पोलिस स्टेशन पोलिस निरीक्षक संदेश केंजळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार राऊत 

करीत आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा (0)

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!