पिंपळे जगताप मध्ये पानटपरी चालकावर खुनी हल्ला
हप्ता न दिल्याने उपसरपंच महिलेच्या पतीकडून खुनी हल्ला
शिरू
र,
( प्रतिनिधी ) पिंपळे जगताप ता. शिरुर येथील एका पानटपरी चालकाने पानाचे पैसे मागितल्याने उपसरपंच महिलेच्या पतीने पानटपरी चालकाला दमदाटी करत दहशत निर्माण करुन हप्ता मागत हप्ता न दिल्याने पानटपरी चालकाच्या खुनाचा प्रयत्न केल्याची घटना घडली असल्याने शिक्रापूर स्टेशन येथे पिंपळे जगतापच्या नितीन उर्फ आण्णा राजेंद्र कुसेकर, सचिन राजेंद्र कुसेकर, रवींद्र उर्फ पांडा राजाराम जगताप यांसह एक अनोळखी युवकावर खुनाचा प्रयत्न केल्याची घटना घडली आहे.
पिंपळे जगताप ता. शिरुर येथील चौफुला येथे शिवदरबार पान शॉपचे चालक किसन नप्ते हे रात्रीच्या सुमारास त्यांच्या दुकानात असताना पिंपळे जगतापच्या माजी उपसरपंच यांचे पती नितीन कुसेकर, सचिन कुसेकर, रवींद्र जगताप हे एका कारमधून आले त्यांनी नप्ते यांच्याकडून चार पान घेतले त्यांनतर नप्ते यांनी पैसे मागितले असता त्यांनी कसले पैसे मागतो, आमची दहशत माहित नाही का, आमची गावात दहशत आहे, लोक आम्हाला हप्ता देतात तू पण दोन हजार रुपये हप्ता दे असे म्हटले असता नप्ते यांनी तुम्हाला का हप्ता देऊ असे म्हटले असता नितीन याने त्याच्या सहकाऱ्यांना याला दुकानातून बाहेर घेऊन हिसका दाखवा असे म्हणून बाहेर घेत चौघांनी लोखंडी गजाने बेदम मारहाण करत खुनाचा प्रयत्न करत जीवघेणा हल्ला केला, सदर घटनेत किसन शिवाजी नप्ते वय ४४ वर्षे रा. नप्ते वस्ती करंदी ता. शिरुर जि. पुणे यांनी शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे फिर्याद दिल्याने पिंपळे जगतापच्l येथील नितीन उर्फ आण्णा राजेंद्र कुसेकर, सचिन राजेंद्र कुसेकर, रवींद्र उर्फ पांडा राजाराम जगताप यांसह एक अनोळखी युवक सर्व रा. पिंपळे जगताप ता. शिरुर जि. पुणे यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल केला असून पुढील तपास पोलीस निरीक्षक दिपरतन गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक महेश डोंगरे हे करत आ
हे.